Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - डॉक्टरने पत्नी व मुलांना मारून स्वतः केली आत्महत्या

No comments

   News24सह्याद्री - डॉक्टरने पत्नी व मुलांना मारून स्वतः केली आत्महत्या..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या 




TOP HEADLINES


1. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बाजवला मतदानाचा हक्क..
आज अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान उत्साहात पार पडल असून संगमनेर तहसील कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी  देखील अहमदनगर जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संगमनेर मध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 

2. डॉक्टरने पत्नी व मुलांना मारून स्वतः केली आत्महत्या !

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात यांनी त्यांची पत्नी आणि  दोन मुले यांना विषारी इंजेक्शन देऊन पहिल्यांदा मारल आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केलीय.  

3. शेवगावच्या भारदे हायस्कूल मध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न 
शेवगाव तालुक्यातील बाळासाहेब भारदे हायस्कूल मध्ये  "दत्त लहरी" या रमेश नानासाहेब भारदे यांच्या संस्कृत स्तोत्राचा  "मराठी ओवीबद्ध अनुवाद" या पुस्तकाच प्रकाशन 

4. जामखेडमध्ये भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेशआजबे आणि शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड यांच्या वतीने भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. यावेळी आ.रोहित दादा पवार यांच्या हस्ते नारळ फोडून या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आलीय.

5. आजोबा शरद पवार यांच्याप्रमाणे रोहित पवारांचे पावसात भाषण 
जामखेड मध्ये शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राहुल कन्स्ट्रक्शन आयोजित क्रांती गृप मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आणि  कोरोना वाॅरियर्सचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

6. विना मास्क फिरणाऱ्यांवर पारनेर पोलिसांची धडक कारवाई 
विना मास्क फिरणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांच्या विरोधात पारनेर पोलिस स्टेशन यांच्या वतीने धडक मोहीम सुरु करण्यात आलीय. 

7. पारनेरमध्ये जिल्हा बँक निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार
पारनेर तालुक्यात आज जिल्हा बँक निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडलीय.  यावेळी सोसायटी मतदार संघात 100% मतदान झालय. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हि मतदान प्रक्रिया  शांततेत पार पडलीय.

8. कोपरगावमध्ये सेवा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न 
तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने कोपरगावमधील  सेवा फाउंडेशनच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

9. विद्युत वाहनांसाठी संगमनेरात मोफत चार्जिंगची सुविधा
संगमनेरातील विजेवर वाहने चालविणाऱ्यांसाठी नगरपालिकेने अभिनव सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नगरपालिकेत उपलब्ध असलेल्या सौर उर्जेच्या सहाय्याने पालिकेच्या प्रांगणात चार्जिग सेंटर उभारण्यात आल असून या सेंटरमध्ये वाहनचालकांना आपल्या वाहनांची मोफत चार्जिंग करता येणार आहे.  

10. कोपरगाव तालुक्यातील आरोपी ३ जिल्ह्यातून तडीपार

कोपरगाव  शहरातील गोकुळनगरी येथील राहुल शिदोरे याला  यास अहमदनगर, नाशिक आणि  औरंगाबाद जिल्ह्यातून ९ जानेवारी २०२१ पासून २० महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *