जिल्ह्याची खबरबात - आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना
News24सह्याद्री - आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. दिव्यांग सोनाली चेडेची आदर्श कामगिरी
सावली दिव्यांग संस्थे कडून दिव्यांगांना व्यवसायाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न चालु आहे आणि या माध्यमातूनच उच्चिशक्षीत असुनही नोकरी न मिळाल्याने खचुन न जाता आदर्श उभा केला आहे
2. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा यांच्या वतीने रास्ता रोको
शेवगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तातडीने जोडावे, शेतकऱ्याचे अनुदान खात्यात वर्ग केले नाही
3. आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना
संपूर्ण महाराष्ट्रासह कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय यंत्रणातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
4. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत लोणी येथे विनामास्क , सोशल डिस्टन्सचे उल्लघन करणाऱ्यावर काल कारवाई करण्यात आली, यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या 107 जणांवर कारवाई करून त्याच्याकडून दंड स्वरूपात १० हजार ७०० रुपये वसूल करण्यात आला आहे.
5. मेलेल्या कोंबड्या आणून टाकल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण
राहाता तालुक्यातील हणमंतगाव शिवेवरील ओढयाजवळील विलास ब्राह्मणे याच्या शेताजवळ अज्ञात व्यक्तीने मेलेल्या कोंबड्या आणून टाकल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
6. शॉर्टसर्किटने जिनिंग मिलला आग; ३ कोटींचे नुकसान
शॉटसर्किटने लागलेल्या आगीत अमरापूर येथील वाय. के.कॉटन अॅण्ड जिनिंग मिल मधील कपाशीच्या गाठी व मशनिरी जळून सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले.
7. अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
माहेरी गेलेल्या पत्नीस दुचाकीवरून सासरी आणण्यासाठी जाणाऱ्या पतीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर अंजनापूर शिवारात हॉटेल मनोदीप जवळ शनिवारी रात्री घडली आहे.
8. नोटबंदी, जीएसटीनंतर महागाईच्या भडक्याने जनता होरपळत आहे - खा. वीरसिंग
बहुजन समाज पार्टीच्या मुंबई,चेंबूर येथील कार्यालयात अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकित खासदार वीरसिंग यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला.
9. संगमनेरात मंगल कार्यालयावर प्रशासनाची दंडात्मक कारवाई
कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आज संगमनेर मधील अमृता लॉन्स या मंगल कार्यालयावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे.
10. न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयास मिळाला स्वायत्त दर्जा
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयास भारत सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली कडून शैक्षणिक वर्ष 2021- 22 पासून पुढील दहा वर्ष करिता स्वायत्त व महाविद्यालय दर्जा घोषित करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment