जिल्ह्याची खबरबात - पद्मश्री तात्याराव लहाने यांची भाजप सरकारवर टीका
News24सह्याद्री - पद्मश्री तात्याराव लहाने यांची भाजप सरकारवर टीका...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
गोदावरी स्वछता अभियानाचा शतकपूर्ती साजरा
कोपरगाव शहरातील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वच्छता दूत आदिनाथ ढाकणे यांनी सुरू केलेल्या गोदावरी नदी स्वच्छता अभियानास शनिवार रोजी १०० आठवडे पूर्ण झाले त्यानिमित्ताने गोदामाई स्वच्छता अभियानाची गोदावरी नदी पात्रात शतकपूर्ती साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी नदीचे जलपूजन करून करण्यात आली
पल्स पोलिओ लसीकरण शुभारंभ - शालिनीताई विखे पाटील
लोणी बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते झाला .पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ लोणी येथे पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करताना जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, प स सद्स्य संतोष ब्राम्हणे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण विखे, दिलीप विखे, राहता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद म्हस्के, डॉ हर्षदा म्हस्के,डॉ श्रीपाद मैड व ग्रामस्थ उपस्थित होते.
निद्रिस्त गणपती मंदिरात चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बु निद्रिस्त गणपती मंदिरातील चतुर्थीनिमित्त आज अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात प्लस पोलीओ लसीकरण
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात प्लस पोलीओ डोस चे लसीकरण डॉ. सदाफुले, डॉ. राख,यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हाळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात हि प्लस पोलीओ डोसचे लसीकरण डॉ. श्रीमती.संजीवनी बारस्कर ,डॉ. श्रीमती. राणी नागरगोजे, यांच्या हस्ते करून पोलीओ मुक्त भारत या अभियनाची सुरुवात करण्यात आली आहे.
पद्मश्री तात्याराव लहाने यांची भाजप सरकारवर टीका
नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठान च्या पुरस्कार वितरण कार्यक्रम नंतर सत्काराला उत्तर देताना पद्मश्री तात्याराव लहाने यांनी भाजप सरकारवर टीका करताना मोठे वक्तव्य केल आहे.
ट्रॅक रेसर्स स्पोर्ट्स फाऊंडेशन अळकुटी चे घवघवित यश
महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा पुणे फुलगाव याठिकाणी घेण्यात आली या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याच्या १६ वर्षे मुली या गटात अळकुटी गावातील कुमारी साक्षी भंडारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला व 18 वर्षे मुले या गटात रांधे गावातील कुमार करण गहाणडुले याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला .
शिर्डी विमानतळाचा नामांतर मध्ये समावेश
बऱ्याच दिवसांपासून विमानतळाची नावेही बदलण्यात यावी यासाठी विविध पक्ष असतील किंवा विविध संघटना असतील यांनी मोर्चे देखील काढले होते परंतु आता स्वतः केंद्राकडून ही जबाबदारी घेण्यात आली आहे कारण आता राज्यातील शिर्डी येथील विमानतळाचा यात समावेश नामांतरामध्ये येणार आहे .
ऍम्ब्युलन्समध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग
नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात असणार्या 108 रुग्णवाहिकेत कार्यरत असणार्या डॉक्टरने रुग्णवाहिकेतून रुग्णाला अहमदनगर येथे घेऊन जात असताना रुग्णाच्या नातेवाईक महिलेसोबत अश्लील चाळे केले.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन नेवासा पोलिसांत संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नगर शहरातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही
देशभरामध्ये सुरू झालेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेचा नगर शहरातील लसीकरणा चां शुभारंभ शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते चि.स्वराज कोरडे या बाळाला प्रथम लस देऊन करण्यात आला. या वेळी महापौर वाकळे यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या 5 वर्षापर्यंत च्या मुलांना पोलिओ चां डोस आज न चुकता आवश्य द्या कुणी ही या लसिकरणापासून वंचित राहू नका.
मोबाईल चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद
घरामध्ये चार्जिंग ला लावलेला मोबाईल चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याने चोरून नेला अशी फिर्याद चिमाबाई श्रावण माळी यांनी अकोले पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिस निरीक्षक अनील कटके यांना गोपनीय माहिती मिळाली सदरचा गुन्हा देविदास गाडे यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळून आरोपी देविदास गोडे यास अकोले या ठिकाणावरून ताब्यात घेतले
No comments
Post a Comment