Breaking News

1/breakingnews/recent

12 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

No comments

      News24सह्याद्री -




TOP HEADLINES


1. ‘हम दो, हमारे दो’नुसार देशाचा कारभार चार-पाच जणांच्या हातात
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी  सरकारवर हल्ला चढविला. या कायद्यांमुळे बडय़ा उद्योगपतींना अमर्यादित धान्य खरेदी करता येईल आणि त्याचा साठाही करता येईल, असे गांधी म्हणाले. 

2. राज्यात मागील २४ तासांत ६ हजार १०७ जण करोनामुक्त
राज्यभरात मागील २४ तासांमध्ये ३ हजार २९७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ६ हजार १०७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. याशिवाय २५ रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे.राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ५२ हजार ९०५ झाली आहे. 

3. ट्विटर, फेसबुकसह समाजमाध्यमांना केंद्राचा इशारा
ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदी समाजमाध्यम कंपन्यांनी भारतीय संविधान-कायदे पाळावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारने गुरुवारी दिला. खाती बंद करण्यावरून ‘ट्विटर’शी सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने ही आक्रमक भूमिका घेतली.

4. ‘जय श्रीराम’ घोषणाबाजी पाकिस्तानमध्ये करायची का?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या पुढील निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास विरुद्ध राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला विनाश या मुद्दय़ावर लढल्या जातील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  स्पष्ट केले. ममता बॅनर्जी या अपयशी प्रशासक असल्याचेही शहा म्हणाले.पुढील निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी राज्याच्या मुख्यमंत्री नसतील असा दावाही शहा यांनी केला, 

5. मता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल  
 आज(गुरुवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीएमसी प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. त्यानंतर ममता बॅनर्जींनी देखील कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलताना भाजपावर निशाणा साधला.“ तुम्ही माझ्यावर टीका करू शकता मात्र माझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. 

6. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात
परभणी शहरातील वसमत रस्ता ते उघडा महादेव मंदिर परिसराकडून जायकवाडीच्या डाव्या कालव्यापर्यंत जाणार्‍या रिंग रोडवरील अतिक्रमणधारकांवर महापालिका प्रशासनाने आज मोठ्या पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.  रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केलेली होती. 

7. वाळूज एमआयडीसी परिसरात कोविड१९ लसीकरणाला सुरुवात
औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक वसाहतीत दोन रुग्णालयात दौलताबाद आरोग्य केंद्राच्या वतीने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून  पहिल्या टप्यात १४८ डॉक्टर व कर्मचारी यांना  लस देण्यात आली. 

8. व्याजदर देण्याचं आमिषदाखवत नागरिकांची  फसवणूक   
डोंबिवली सारख्या सांस्कृतिक शहरात पुन्हा एकदा एका ज्वेलर्सने सर्व सामान्यांचे गुंतवणूक चे  रुपये लुबाडल्याची चर्चा उघडकीस आली आहे. नागरिकांचे लाखो रुपये भिशीच्या नावाने घेऊन त्यांना चांगले व्याजदर देण्याचं आमिषदाखवत नागरिकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खातेदारांनी यासंदर्भात मनसे कडे धाव घेतली .

 9. वर्षभराची फी भरा अन्यथा घरी जा 
 कोरोना महामारीच्या काळात देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे 10 महिने राज्यातील शाळा बंद होत्या.त्यात आता शाळा सुरू होताच फीस  वरून विद्यार्थी व पालकांची पिळवणूक होत असल्याचं चित्र पाहायला  मिळत आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील शोभाताई चवरे या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून मागील दहा महिने बंद असलेल्या शाळेची फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत  

10. जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांचे वर्ल्ड रेकॉर्ड
 महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी 39 उपग्रह बनवून हा जागतिक विक्रम नोंदविला आहे हे प्रक्षेपण रामेश्वर येथून करण्यात आले असून  जगातील सर्वात कमी वजनाचे म्हणजे 25 ग्रॅम ते 80 ग्रॅम वजनाचे हे उपग्रह भारतातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या बनवून प्रक्षेपित केल्याने हे सर्व विक्रम प्रस्थापित झालेले आहे.   
  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *