11 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. जुनी कृषी विपणन पद्धतीही कायम!
तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकार आणि संसदेला आदर असून, शेतक ऱ्यांना जुनी कृषी विपणन पद्धतीही वापरण्यास खुली आहे,
2. व्ही. के. सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा!
चीनपेक्षा भारतानेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जास्त वेळा ओलांडली, असे वक्तव्य करून चीनच्या हाती आयते कोलीत देणारे केंद्रीय रस्ते व वाहतूक राज्यमंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टीकरण करावे.
3. देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १.४१ लाखांपर्यंत कमी झाली असून, एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १.३० टक्के आहे.
4. पूर्व लडाख सीमेवरील तणाव निवळण्याचे संकेत
पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठांवरून चीन आणि भारताच्या सैन्याने बुधवारपासून माघारीस सुरुवात केली,
5. १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको
कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन अजून आक्रमक करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. बुधवारी संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडली.
6. ट्विटरच्या अधिकाऱ्यांची सरकारकडून चौकशी
प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसेवरुन सरकार आणि ट्विटरमधील नात्याला आता एक वेगळं वळण आल्याचं पाहायला मिळत आहे.
7. उर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेतील एसईबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
उर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेतील एसईबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारनं देऊ केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे प्रभावित झालेल्या ऊर्जा विभागाच्या भरती मधील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे.
8. महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाचा ७५ वा दिवस
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे अनेक प्रकारे आंदोलन ,मोर्चे, होतात मात्र येथील प्रशासन अनधिकृत बांधकामा वितोधात ठोस कारवाई करताना दिसत नाही हाच मुद्दा घेऊन आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे
9. शासकीय रुग्णालयात आवश्यक सुविधा अद्यावत करा
उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील आवश्यक सुविधा त्वरित अद्यावत करण्यात याव्या अन्यथा रुग्णालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शिंदे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.
10. पुण्यात बनावट लग्न लावणारी टोळी गजाआड
.पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाने पैसे घेऊन बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 11 जणांच्या टोळीला सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपींमध्ये 9 महिला, तर 2 पुरुषांचा समावेश आहे. याबाबत गणेश अर्जुन सावळे याने फिर्याद दिली.
No comments
Post a Comment