Breaking News

1/breakingnews/recent

1 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

No comments

        News24सह्याद्री आज सादर होणार अर्थसंकल्प..पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. राज्यातील करोनाबाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात घट
राज्यातील करोनाबाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली असून रिकव्हरी रेट ९५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याच्या आऱोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

2. भाच्याला मुख्यमंत्री करणे हाच ममतांचा अजेंडा -अमित शहा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या लोकांचे कल्याण करण्याऐवजी केवळ आपल्या भाच्याचे कल्याण साधण्यासाठी  कार्यरत आहेत; विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत त्यांच्यासोबत कुणीच उरणार नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका सभेत  केली.

3. संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राज ठाकरेंची अनुपस्थिती
 शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा पार पडला.

4. आज सादर होणार अर्थसंकल्प 
केंद्रीय अर्थसंकल्पाचीच चर्चा 2021 हे वर्ष सुरु झाल्यापासून पाहायला मिळत आहे. 29 जानेवारीपासून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. ज्यानंतर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बहुप्रतिक्षित असा यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील. 

5. राहुल गांधींना तातडीने पक्षाचे अध्यक्ष बनवा
राहुल गांधी यांना तातडीने पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा ठराव दिल्ली काँग्रेसने संमत केला. दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, फक्त राहुल गांधीच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊ शकतात. 

6. शेतकरी आंदोलनाबाबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची उद्या सर्वपक्षीय बैठक
दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांना पोलीस मारहाण करत आहेत,  गुंड त्यांच्यावर हल्ले करत आहेत, 

7. नोकरी गेल्यामुळे 57 टक्के लोकांनी मुंबई सोडली
कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा कुटुंब सर्वेक्षणावर आधारित “मुंबईत कोविड-19 चा परिणाम - उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरे आणि परिवहन यांबाबत नागरिकांचे सर्वेक्षण हा प्रजा फाऊंडेशनने तयार केला आहे. 

8. वीज कनेक्शन कट होणार
राज्यात थक्कीतवीज बिला मध्ये सूट नाही,वीजबील न भरल्यास ग्राहकांची वीज कट होणार असे संकेत महावितरण कंपनीने दिले आहे, तर राज्यात 70 लाख थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडण्याची मोहीम ही आखण्यात आली. महावितरण कंपनीने थकबाकीदारांना नोटिसा दिल्या आहेत 

9. निम्न ज्ञानगंगा धरणावर शेतकऱ्यांचं उपोषण सुरूच 
निमकवळा शिवारातील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प २ च्या धरणाच्या भिंतीवर जाऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतीचा व फळबागाचा मोबदला मिळण्यासाठी  प्रजासत्ताकदिना  पासून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला स्वाभिमानी युवा आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी उपोषणकर्ते शेतकऱ्यांची भेट घेतली

10. औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहती पासून जवळच असलेल्या
दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील जांभळा गावातील मिलिंद रघुनाथ दाणे  ही व्यक्ती  पाण्याचा जार घेण्यासाठी जात असताना त्याला दारूच्या नशेत आसलेल्या  कार चालकाने  कार निष्काळजी पणाने चालूनमिलिंद दाने यास जोराची धडक दिल्याने  त्याचा जागीच मृत्यू झाला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *