Breaking News

1/breakingnews/recent

14 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

    News24सह्याद्री - दिल्लीत हाडं गोठवणारी थंडी, मुंबईत पारा चढला....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. WHO वुहान दौऱ्यावर
चीनमध्ये सध्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये पुन्हा वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेमधील 10 सदस्यांचं पथक कोरोना महाामारीच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी वुहान शहराच्या दौऱ्यावर जात आहे.

2. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेडमध्ये बांग्लादेशचे जवान सहभागी होणार
जॉन्सन यांचा दौरा रद्द झाला असला तरी बांग्लादेशच्या जवानांची एक तुकडी यंदा प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या राजपथावरील परेडमध्ये सहभागी होणार आहे.  एखाद्या विदेशी सैन्याच्या तुकडीला आपल्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी करुन घेण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी फ्रान्स आणि UAEच्या तुकड्या राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

3. दिल्लीत हाडं गोठवणारी थंडी, मुंबईत पारा चढला
दिल्ली आणि उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजधानीत 3.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत मंगळवारी यावर्षातील सर्वाधिक 35.3 अश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर आज मुंबईत 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे  

4. औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा?
उस्मानाबादमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवर त्याची माहिती देताना शहराचा उल्लेख 'धाराशिव-उस्मानाबाद' असा करण्यात आला आहे.  

5. नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड
समीर खान यांच्या घरात एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.    ब्रिटिश नागरिक असलेला ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे.  

6. निर्णय घेण्यात राष्ट्रवादीचे नेते प्रगल्भ - संजय राऊत 
एखाद्यावर वैयक्तीक टीका केल्यास त्याचे आयुष्य, कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. यामुळे राजकीय नेत्यांनी एकामेकांवर असले आरोप करू नयेत. राज्य सरकार अडचणीत येईल हा विरोधकांचा भ्रम आहे, असेही राऊत म्हणाले.

7. सातारा पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता
 खासदार उदयनराजे भोसलेंनी सातारा विकास आघाडी' या स्लोगनचा समावेश असलेल्या कॅलेंडरचे प्रकाशनही केलं. त्यातून पुढील निवडणुकीची त्यांची घोषणाही स्पष्ट झाली.  तर पक्षाचा झेंडा कायम ठेवण्यासाठी भाजपने आपला वेगळा अंजेडा मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे.

8. नोकरी सोडताना नोटीस पीरियड पूर्ण न करणाऱ्यांना मोठा झटका
कर्मचारी मोठ्या पदावर असेल तर त्याला 3 किंवा 6 महिन्यांचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागतो. मात्र, आता नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तर तुम्हाला 18 टक्के GST भरावा लागणार आहे.  

9. मकरसंक्रांतीला सोन्याचे दर घसरले
मुंबईत 24 कॅरेट आजचा सोन्याचा भाव 49 हजार 450 रुपये प्रति तोळा आहे. तर, मुंबईत चांदीचा भाव 66 हजार रुपये प्रति किलोवर घसरला आहे. तर, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 48 हजार 450 रुपये प्रति तोळा इतका आहे   

10. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग दुसर्‍या दिवशी वाढ
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर दिसून येत आहे. देशात कालच्या दरांच्या तुलनेत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेल 22 पैशांने महागले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *