Breaking News

1/breakingnews/recent

19 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - ग्रामपंचायत निवडणूक निकाल: शिवसेनेनं मारलं मैदान...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. रिपब्लिक टीव्हीचं सदस्यत्व रद्द  करा  

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणाचा रिपब्लिक टीव्हीला फटका बसण्याची शक्यता आहे. गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर एनबीएने टीव्ही रेटिंगवरून ‘बार्क’वर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिक टीव्हीचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी दूरचित्रवाणी वाहिन्यांची देशातील शिखर संस्था असलेल्या ‘आयबीएफ’कडे केली आहे.

2. ग्रामपंचायत निवडणूक निकाल: शिवसेनेनं मारलं मैदान,
राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत होता. अखेर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून, शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मैदान मारलं आहे. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर असून, काँग्रेसच्या जागांपेक्षा विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे.

3. शिवसेनेचा भाजपाला इशारा
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. अनेक ठिकाणी सत्तांतर झालं, तर काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. निवडणूक निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपानं केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज असून, जनतेची नाराजी निकालातून दिसल्याचं भाजपा नेत्यांकडून सांगण्यात आलं. भाजपाच्या या दाव्यांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. “ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा देत शिवसेनेनं भाजपाच्या आरोपांचा समाचार घेतला आहे.

4.  मजुरांचा ट्रकखाली चिरुडून मृत्यू 
गुजरातमधील सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेले सर्वजण हे मजूर आहेत.

5. बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह दि. 28 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे  

6. यंदाच्या हंगामातली पहिला हापूस आंबा पुणे मार्केटात दाखल 
हंगामी फळांनी सध्या बाजारपेठा सजल्या आहेत. अशात आता आंबा प्रेमींसाठीही एक आनंदाची बातमी आहे. हंगामातील पहिला हापूस आंबा हा शहरातील सगळ्याच बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. पाच डझन आंब्याच्या पहिल्या पेटीची त्याची किंमत 25,000 रुपये ठेवण्यात आली आहे. खरंतर, कोरोनाच्या संकटामुळे फळांच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा आंबाही मोलामहागाचा खावा लागणार आहे. मागच्या वर्षी याच आंब्याच्या पेटीची किंमत 21,000 रुपये होती.

7. फॉरेन रिटर्न पीएचडीधारक महिलेच्या नेतृत्त्वात ग्रामपंचायत निवडणूक
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणारी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत. या निवडणुकी अगदी 21 वर्षाच्या तरुणासह 85 वर्षांच्या आजीबाईंनी सहभाग घेतला आणि निवडूनही आल्या. ग्रामपंचायतीच्या राजकारणात फॉरेन रिटर्न पीएचडीधारक महिलने सहभाग घेतला होता आणि त्यांचा विजय देखील झाला. डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे असं त्यांचं नाव आहे.  

8. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी,भाजपाच्या महीला आघाडीचा तहसील कार्यालयावर मोर्चा  
रेणू शर्मा हया महिलेने न्यायमंत्री,कँबिनेट मिनिस्टर असलेले धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर असे आरोप केल्याने मुंडे हे चांंगलेच अडचणीत सापडले आहेत. अत्याचार पिडीत महीलेच्या चारीत्र्यावर प्रश्न चिन्ह उभे केले गेले आहे.महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे आहे.अतिशय गंभीर आरोप असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरीत आपल्या पदाचा राजीनामा दयावा. हया मुख्य मागणीसाठी काल भाजपा महीला मोर्चा च्या प्रिया शर्मा,अध्यक्षा अश्विनी मढवी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी तहसीलदार विजयकुमार वाकोडे यांना निवेदन देण्यात आले.

9. इंदापूर तालुक्यातील 38 ग्रामपंचायत वर भाजप ची सत्ता  
इंदापूर तालुक्यात 38 ग्रामपंचायतींवर भाजपची निर्विवादपणे सत्ता आली आहे, तर 4 ग्रामपंचायती संमिश्र आहेत. भिगवण, वालचंदनगर आदी प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपने एकतर्फी सत्ता मिळवली आहे. या निवडणूक निकालातून इंदापूर तालुक्यावरील भाजपचे वर्चस्व निर्विवादपणे  सिद्ध झाले आहे,अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निकालानंतर बोलताना सॊमवारी दिली. 

10. तर अश्या लोकांनी कोवॅक्सीन घेऊ नये...
भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे त्यांनाही कोवॅक्सीन घेऊ नये असं म्हटलं आहे. सध्या जे आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी आहे त्यांनाही कोवॅक्सीन घेऊ नये असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. गरोदर महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला म्हणजेच नवजात बालकांच्या मातांनाही सरकारने लसीकरणाच्या कार्यक्रमातून यापूर्वीच वगळले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *