Breaking News

1/breakingnews/recent

12 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री - राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. यंदाचा अर्थसंकल्प छापला जाणार नाही

कोरोना महामारीच्या संकटाला एक वर्ष उलटत असतानाच आता यंदाचा अर्थसंकल्प पुढील काही दिवसांत जाहीर केला जाईल. मात्र यंदाचा अर्थसंकल्प आतापासूनच चर्चेत आहे. कारण  2021 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प छापला जाणार नाही. 1947 पासूनच्या प्रवासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. कोरोना व्हायरस, कोविड 19 च्या महामारीमुळं यंदा अर्थसंकल्पीय कागदपत्र छापली जाणार नाहीत. केंद्रीय अर्थमंत्रालयानुसार कोरोनाच्या संकटामुळं अर्थसंकल्प छापण्यासाठी दिवसरात्र छपाई कामासाठी छपाई कारखान्यात एकाच वेळी 100 जणांना कामासाठी एकाच ठिकाणी ठेवण्यात येणार नसल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.

2. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक अपघातात जखमी
कर्नाटकमधील अंकोला तालुक्यात हिल्लूर-होसकांबी गावाजवळ केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला, त्यामध्ये नाईक यांच्या पत्नी विजया यांचा मृत्यू झाला असून  श्रीपाद नाईक जखमी झाले आहेत.अपघातामध्ये विजया यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली, त्यांना जखमी 

3. मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून तपास सुरु असून आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी आणि त्यांच्या संबंधितांची नावं समोर आली आहेत. अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अजून एक अटक करण्यात आली असून मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ दुकानाच्या मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एनसीबीकडून सोमवारी रात्री अटकेची कारवाई करण्यात आली. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर एनसीबीकडून सोमवारी त्याची चौकशी करण्यात आली होती.  

4. पुण्याहून कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना
 आजपासून सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत.

5. उस्मानाबादच्या वसंतदादा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द
उस्मानाबादमधील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यत आलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बँकेला आजपासून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.  रिझर्व्ह बँकेने एक प्रेसनोट रिलीज करून वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे

6. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतरही अस्लम शेख ठाम
“मुंबई महानगरपालिकेत दोन आयुक्त ठेवावे, हिच माझी मागणी आहे. मी यावर ठाम आहे”, काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत एकच आयुक्त असेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही अस्लम शेख यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करत मागणीवर ठाम असल्याचं म्हटलं  

7. राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक
राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेची महत्त्वाची बैठक होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे. राज ठाकरे या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

8. नागपुरहून पुण्याला येणाऱ्या तरुणीवर धावत्या बसमध्ये दोन वेळा बलात्कार
राज्यात महिला अत्याचाराची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरवरून पुण्याला येणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर खासगी बसमध्ये दोन वेळा बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ६ जानेवारीला रात्री प्रवासादरम्यान ही घटना घडली. चाकूचा धाक दाखवून क्लिनरने तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्याचबरोबर अत्याचाराची वाच्यता केल्यास बसमधून फेकून देण्याची धमकी आरोपीनं दिली होती.  

9. परळीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला प्रदूषण महामंडळाची नोटीस
परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्र प्रशासन राखेच्या उघडय़ा वाहतुकीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करत नसल्याचा ठपका ठेवून औरंगाबाद प्रदूषण नियंत्रण मंडळाने  वीज निर्मिती केंद्राचा उद्योग बंद का करण्यात येऊ नये, तसेच  पाणी व वीज पुरवठा खंडित करण्यासंदर्भात संबंधितांना का सांगू नये अशी नोटीस बजावली आहे.  

10. भारतीय संघाला आणखी एक धक्का
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाल्यानं अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहालाही दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना बुमराहाला एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाला होता. त्यामुळं अखेरच्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *