Breaking News

1/breakingnews/recent

21 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

           News24सह्याद्री - शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई - आ. काळे- भास्करराव पेरे..पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये 




TOP HEADLINES


1. बोठेला लवकरच गजाआड करणार - पोलीस अधीक्षक
 जिल्हा अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला. या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव आणून निष्पक्षपणे तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काल श्रीरामपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली.

2. महिलेला भुरळ पडून दीड तोळा वजनाचे मंगळसूत्र केले लंपास 
धनंजय पुरोहित व त्यांची पत्नी धनश्री यांनी नवीपेठ व बस स्थानक परिसरात त्या भामट्यांचा शोध घेतला. मात्र ते भामटे पसार झाले होते. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

3. कोल्हारमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
चोरटयांनी तब्बल चार ठिकाणी चोरी केली मात्र केवळ एकच ठिकाणी त्यांना सव्वा लाखांचा ऐवज मिळाला. इतर ठिकाणी त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. एक महिलेचे तोंड दाबून सदरचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या सदर घटनांची माहिती मिळताच लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या सर्व प्रकाराने कोल्हार भगवतीपूरमध्ये खळबळ उडाली.

4. नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप सज्ज
दावा डोळ्यात धुळफेक करणारा आहे. तसेच नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजप सज्ज असून विधानसभेचा वचपा नगरपरिषदेत काढणार, असा इशारा आमदार रोहित पवार यांना नाव न घेता लावला. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी चौंडी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
5. ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक घेण्याची सभासदांकडून मागणी
उमेदवार अर्ज दाखल केलेल्या अर्जावर चुकीचे निर्णय घेण्यात आला की सलग तीन वर्षे ऊस पुरवठा न करणे, उसाची अन्यत्र विल्हेवाट लावणे व अन्य चुकीच्या अटी घालून विरोध जिवंत राहिला नाही पाहिजे, अशी कारखान्याच्या व्यवस्थापकाची भूमिका आहे. परंतु कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तसाच उभा ठेवून बाहेरून ऊस आणला जातो. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक करावी, यासाठी आम्ही तयार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

6. पिचड यांच्या तब्येतीची फडणवीसांकडून  विचारपूस
भेटीसाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरळी गाठली. यावेळी त्यांनी पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली माजी आमदार वैभव पिचड देखील यावेळी उपस्थित होते.

7. शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई - आ. काळे 
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकसान भरपाईपोटी पहिल्या हप्त्याची ३ कोटी १ लाख रुपयांचे नुकसान भरपाईची रक्कम मागील वर्षी शेतकऱ्यांना अदा केली. आता दुसऱ्या टप्प्यातील ४ कोटी 64 लाख 58 हजार रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली

8. थकीत वेतनासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा
मुख्यधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारास कर्मचारी वैतागले असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला. आमदार रोहित पवार यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. कार्यपद्धतीत बदल न झाल्यास ‘सीओ हटाव, जामखेड बचाव’ आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले 

9. जिल्हाधिकाऱ्यांकडून देवळालीतील विकास कामांची पाहणी
जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी प्रथम देवळालीप्रवरा शहरांमध्ये व परिसरात झालेल्या जलसंधारण ओढ्यांच्या खोलीकरण व रुंदीकरण तसेच पालिकेने राबवलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर नगर परिषदेच्या कार्यालयात विविध विकास कामांचा आढावा घेतला व रखडलेल्या अनेक कामांच्या त्रुटींवर पर्याय काढून त्या कामाला मंजुरी देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली

10. थकित वेतन अभावी नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ
नेवासा नगरपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी,सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांचे चार महिन्याच्या थकीत वेतन मिळावे या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून 24 जानेवारीपर्यंत ते वेतन न दिल्यास 25 जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *