21 जानेवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - नागपुरात पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
१. अकोल्यात तरुणांचं उपोषण
अकोल्यात सेवा भरती 2016-17 अंतर्गत अकोला परिवहन विभागात कनिष्ठ सहाय्यक पदाकरिता अनेकांची निवड झालीय. मात्र, पात्र ठरलेल्या काही उमेदवारांपैकी काहीच उमेदवारांना कार्यालयामार्फत नियुक्ती आदेशही देण्यात आले. त्यामुळे भरती प्रक्रियेत घोळ होत असल्याचे दिसत असल्यानं या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या तरुणाईने हे आमरण उपोषण पुकारलय.
२.अकोल्यात रक्तदान शिबीर संपन्न
महाराष्ट्रामध्ये कोरोना काळात जो रक्ताचा तुटवडा निर्माण झाला तो तुटवडा भरून काढण्यासाठी खारीचा वाटा म्हणून महात्मा फुले विद्यार्थी परिषद अकोला, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, कैलास ईश्वर शिवभक्त मंडळ आणि गजानन चौक मित्र मंडळ यांच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात आलेत.
३. निलेश राणेंचा गंभीर आरोप
कोकणातील बहुचर्चित आणि वादग्रस्त नाणार प्रकल्पावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. "नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने कमिशन घेतले आहे", असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे.
४. ओडिसी इलेक्ट्रीकची 'स्लो' इलेक्ट्रीक स्कूटर लाँच
लीड-अॅसिड आणि लिथियम आयन बॅटरीज अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या ई-स्कूटर रस्त्यावर धावण्यासाठी स्वस्त पर्याय ठरणार आहेत. शिवाय त्यांच्याकरिता कोणत्याही नोंदणीची किंवा परवान्याची आवश्यकता नसते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत देखील इतर इलेक्ट्रीक स्कूटरच्या तुलनेत कमी असून ती युवा वर्ग आणि महिलांसाठी उत्तम पर्याय ठरेल
५ . नागपुरात पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश
नागपुरात पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नागपूर गुन्हे शाखा पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत 5 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केलं. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
६.'मतदार राजांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू'
थेऊर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य करत यापुढील काळात मतदार राजांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू, असे आश्वासन सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी दिलाय.
७. भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ मराठवाडा विभागाची बैठक संपन्न
भारतीय जनता पक्षाचे प्रकोष्ट सांस्कृतीक मराठवाडाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय भाजपच्या सचिव विजया रहाटकर, महाराष्ट्र संयोजक सांस्कृतिक प्रकोष्ठ शैलेश गोजमगुंडे, प्रदेश सहसंयोजक योगेश सोमण, प्रदेश सहसंयोजक उमेश घळसासी यांनी मार्गदर्शन केलय.
८. डॉक्टर नवरा-बायकोचं साध्या पद्धतीने लग्न
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील डॉक्टर स्वप्निल कनीरे आणि लातूरच्या प्रीती निटूरे या नववर-वधूंनी आपले लग्न साध्या पद्धतीने करुन लातूर येथील सेवालयातील एचआयव्ही अनाथाला एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. समाजात लग्नांवर लाखो रुपयांच्या उधळपट्टीचं फॅड आलेलं असताना डॉक्टर वराने उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद असल्याचे बोललं जात आहे.
९. रोहित पवारांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर
महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयाला वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
१०. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
१२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते
YOU MAY ALSO LIKE
solapur
No comments
Post a Comment