14 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे - निलेश राणे...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. 214 ग्रामपंचायतिसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन वाटप
जिल्हाधिकारी कार्यालयामधून निवडणूक साहित्य वितरित करण्यात आले.अकोला तालुका निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांच्या देखरेखीखाली हे साहित्य वाटप करण्यात आले. दरम्यान, साहित्य वाटप केल्यानंतर सर्व कर्मचारी हे खासगी बसने बुथवर पाठविण्यात आले.
2. Samsung लाँच करणार 200 मेगापिक्सलचा फोन
दुसरीकडे साउथ कोरियन कंपनी सॅमसंग यावर्षी नवा इनोव्हेटिव्ह कॅमेरा सेन्सर लाँच करणार असल्याची माहिती लीकस्टर Ice Universe ने दिली आहे.
3. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे - निलेश राणे
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. मुंडेंवरील आरोपामुळे राष्ट्रवादी कोंडीत सापडली असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. आता भाजप खासदार निलेश राणे यांनी यात उडी घेतली असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
4. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, 'संक्रमण अर्थात बदल होताना परस्परांचा आदर करा, असं निसर्ग शिकवतो. आज मकर संक्रांत, त्यामुळे या संक्रमणातूनही असाच बदल होत असताना आव्हांनांवर मात करण्याची प्रेरणा घेऊ या. परस्परांप्रती आदर भाव, प्रेम, जिव्हाळा वाढवू या. राज्यातील जनतेला मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
५. व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे जगभर एकच खळबळ
कोरोना व्हायरसचा कहर आटोक्यात येत असतानाच कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे जगभर एकच खळबळ उडाली आहे. या नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे.
6. 'काश्मीरच्या राणी'च्या भूमिकेत दिसणार कंगना!
'मणिकर्णिका रिटर्न्स' या चित्रपटात काश्मीरच्या राणी कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगना रानौतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे
7. तुमच्या पंखांमध्ये शिक्षक, मार्गदर्शकांनी बळ दिले आहे.
आता जिंकण्याची जिद्द ठेऊन भरारी घ्या, असा मंत्र देत विजयी भव: अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांना दिला. प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीतील राजपथावरील ध्वजसंचलनामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. दुरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी दिल्ली येथे शिबीरात सहभागी छात्रसैनिकांशी संवाद साधला.
८. 18 जानेवारीपासून मुंबई, ठाण्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता
सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पालिकेच्या शिक्षण विभागाने पाठवल्यामुळे आता मुंबई, ठाण्यातील शाळांमध्ये 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु होण्याची सकारात्मक चिन्हे दिसू लागली आहेत. पण नियमावलीनुसार पालकांचे संमतीपत्र आणि शिक्षकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट शाळा सुरु करण्यापूर्वी देणे आवश्यक आहे.
9 . मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दोन वर्षांत १५४ अपघातांत ८२ जणांचा बळी
एकापाठोपाठ झालेल्या या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षित प्रवासाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. अपघातांची मालिका कधी थांबणार, असा सवाल वाहनचालक, प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. असे असले तरी बहुतांश अपघातांमध्ये मानवी चुका असल्याचे समोर आले आहे.
10. अमेरिकेच्या इतिहासातील महाभियोगाची दोनदा कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प पहिलेच राष्ट्राध्यक्ष
सत्तेवर असताना एकाच कारकीर्दीमध्ये अमेरिकेत दोनदा एखाद्या राष्ट्राध्यक्षाविरूद्ध महाभियोग आणण्याचा ही पहिलीच घटना आहे. दरम्यान 232 लॉ मेकर्स मध्ये 10 रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी देखील महाभियोगाला पाठिंबा देत प्रस्ताव मंजूर केला आहे.
सत्तेवर असताना एकाच कारकीर्दीमध्ये अमेरिकेत दोनदा एखाद्या राष्ट्राध्यक्षाविरूद्ध महाभियोग आणण्याचा ही पहिलीच घटना आहे. दरम्यान 232 लॉ मेकर्स मध्ये 10 रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी देखील महाभियोगाला पाठिंबा देत प्रस्ताव मंजूर केला आहे.
No comments
Post a Comment