Breaking News

1/breakingnews/recent

वॉर्नरला अवघ्या 5 धावांवर बाहेरचा रस्ता दाखवला, लाजीरवाण्या विक्रमाची नोंद

No comments

 


मुंबई -

ऑस्ट्रलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर  खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने संघात पुन्हा पुनरागमन केले आहे. वॉर्नरने खूप आठवड्या नंतर संघात परतला आहे. दुखापतीमुळे वॉर्नर संघाबाहेर गेला होता. वॉर्नर परतल्यानंतर वॉर्नरकडून ऑस्ट्रेलियाला चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र मोहम्मद सिराजने वॉर्नरला अवघ्या 5 धावांवर बाहेरचा रस्ता दाखवून दिला. सिराजने वॉर्नरला स्लीपमध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं. यासह वॉर्नरच्या नावे लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. 

वॉर्नर ऑस्ट्रेलियामध्ये 25 डावानंतर पहिल्यांदा 10 पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला. यासह वॉर्नरच्या नावे लाजीरवाणा विक्रम झाला आहे. सिडनीमध्ये वॉर्नरने धमाकेदार कामगिरी केली आहे. वॉर्नरने 2015 नंतर 4 शतक आणि 2 अर्धशतकांसह एकूण 14 डावांमध्ये 741 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी पाहता वॉर्नर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना होती. मात्र सिराजने वॉर्नरला 5 धावांवर बाद केल्याने कांगारुंचा अपेक्षाभंग झाला.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंजासाठी डेव्हिड वॉर्नर आणि कसोटी पदार्पण केलेला विल पुकोव्हस्की खेळायला आले. मात्र ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट लवकर गमावली. मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला 5 धावांवर आऊट केले. यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. लाबुशेन आणि पुकोव्हस्कीने दुसऱ्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. या दरम्यान पुकोव्हस्कीने पदार्पणातील सामन्यात अर्धशतक लगावले. मात्र अर्धशतकानंतर नवदीप सैनीने पुकोव्हस्कीला 62 धावांवर एलबीडबल्यू केले. यासह सैनीने कसोटीतील पहिली विकेट घेतली. पावसाने या सामन्यात पहिल्याच दिवशी व्यत्यय आणला. पावसामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *