नेटीझन्सकडून विहारी-अश्विन जोडीचे केले कौतुक, अश्विन-विहारीची झुंजार खेळी
मुंबई -
सिडनी मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना कसोटी अनिर्णित राहिली असल्यामुळे 4 कसोटी सामन्यांमधील मालिकेत 1-1 अशी बरोबरी कायम आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या मोठ्या खेळीमुळे टीम इंडियाच्या जिंकण्याची संधी होती. मात्र दोन्ही सेट फलंदाज निर्णायक क्षणी बाद झाले. त्यामुळे हा सामना टीम इंडियाकडून ड्रॉ च्या उद्देशाने खेळण्यात आला. हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विनने हा सामना ड्रॉ करण्यात मोठी भूमिका बजावली. टीम इंडियाच्या आजी माजी खेळाडू आणि नेटीझन्सकडून विहारी-अश्विन जोडीचे कौतुक केले जात आहे
पंत पाठोपाठ पुजारा आऊट झाला. टीम इंडियाने महत्वाच्या दोन फलंदाजांची विकेट गमावली. त्यामुळे विजयाची आशा कमी झाली. यावेळेस टीम इंडियाचा पराभव होण्याचीही शक्यता होती. सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरणारी ही वेळ होती. त्यामुळे अश्विन आणि विहारीच्या खांद्यावर जबाबदारी होती. पुजारा बाद झाल्यानंतर टीम इंडियाची धावसंख्या 5 बाद 272 अशी होती. अश्विन-विहारीने खेळायाला सुरुवात केली. अतिशय शांतपणे या दोघांनी खेळ केला. कांगारुंनी ही जोडी फोडण्यासाठी सर्व मार्ग अवलंबले. मात्र या दोघांनी आपला संयम सोडला नाही, दोघेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करत होते. या दोघांनी तब्बल पाचव्या दिवसखेर 259 चेंडूंचा सामना केला. यात या दोघांनी नाबाद 62 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.
No comments
Post a Comment