Breaking News

1/breakingnews/recent




मुंबई -

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. रोजच्या आहारात बीटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक आरोग्यदायी गुण आहेत.

1. रक्तदाब नियंत्रण -

बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजर आणि बीटचा 1-1 कप रस पिल्याने याचा मोठा फायदा होता. ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्या.

2. रक्ताची कमतरता -

रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होता. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. रोज 30 ग्रॅम बीट खाल्याने याचा मोठा फायदा होतो. यामुळे लीवरची सूज देखील कमी होते.

3. कॅल्शिअमची स्रोत -

 बीट कॅल्शिअमची पूर्तता करतो. कॅल्शिअम शरिरासाठी महत्त्वाचं तत्व आहे. कॅल्शिअममुळे हाडे आणि दात मजबूत होतात. बीट शरिरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करतो. मुलांनी आणि युवकांनी बीट चाऊन खालं पाहिजे. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.

4. कफचा त्रास -

बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका श्वच्छ ठेवते. बीटच्या रसमध्ये मध टाकून लावल्याने शरिरावर खाज येते त्या ठिकाणी लावल्याने ही समस्या दूर होते. 

5 सांधे दुखी थांबते -

बीटमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. बीटमध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी1, बी2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये कॅलरीज खूप कमी असते.

6. गॅसची समस्या -

 दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधिस समस्या दूर होतात. बीट रोज खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. 

7. महिलांसाठी लाभदायक -

बीटमध्ये फॉलिक अॅसिड असतं. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असतं. बीटमुळे महिलांना ऊर्जा मिळते. मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते. रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर ठरतं. बीटमुळे दूध वाढतं.

८. ऑक्सिजन वाढवण्याचं करतं काम -

 रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये नियमित बीटाचा वापर करणं आवश्यक आहे. 

९. केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट -

बीटामध्ये असणारं फॉस्फरस हे केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट समजण्यात येतं. खरंतर केसांच्या वाढीसाठी बीट हा नैसर्गिक सोर्स आहे. केसांची वाढ करण्यासाठी याचा अत्यंत फायदा होतो. पण बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. तुम्ही नियमित बीट आपल्या जेवणामध्ये खाल्लं अथवा बीटाचा ज्युस रोज प्यायलात तरीही तुमच्या केसांच्या वाढीसाठी याचा फायदा होतो. बीटामुळे केसांमध्ये रोमछिद्र उघडतात आणि त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते. 

१०. त्वचा अधिक उजळवण्यासाठी फायदेशीर -

केवळ केसच नाही तर त्वचेवर रंगत आणण्याासाठीही याचा फायदा होतो. बीट खाल्ल्याने तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. यात आढळणारे अँटिऑक्सिडंट्स हे तुमची त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी मदत करतात.त्यामुळे तुमची त्वचा अधिक उजळण्यासाठी मदत मिळते. तसंच हिमोग्लोबिन शरीरातील वाढलं की, तुमचा चेहरा साहजिकच अधिक उजळतो. यामध्ये लोह, सोडियम, पोटॅशियम या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीर निरोगी राखण्यासाठीही याची मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात तर न चुकता बीटाचा रस प्यायला हवा. त्यामुळे तुमचं शरीर अधिक निरोगी राहण्यास मदत मिळते. 

११. प्रतिकारकशक्ती वाढवतं -

मची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी बीटाचा उपयोग करून घेता येतो. कारण यामध्ये असणारे फायबर्स हे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच बीटामधून नैसर्गिक साखर मिळते. त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा नैसर्गिक प्रमाणात प्राप्त होते. तसंच बीटाचा आणि गाजराचा रस तुम्ही एकत्र करून प्यायलात तर तुम्हाला नैसर्गिक साखर तर मिळतेच शिवाय तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असल्यास, नियंत्रणात राहण्यास मदत  मिळते. 

१२. अधिक थकवा जाणवत असल्यास -

तुम्हाला लवकर थकवा येत असेल आणि ऑक्सिजनचाही त्रास होत असेल तर हे तुमच्या शरीरातील कमी रक्तामुळे होतं. अशावेळी तुम्ही बीटाचा रस नक्की प्यावा. याचा तुमच्या शरीराला अधिक फायदा मिळतो. यामध्ये नैसर्गिक ऑक्सिजन असल्याने तुम्हाला त्वरीत ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा त्वरीत कमी होण्यास मदत मिळते. 

१३. गॅसची समस्या -

बदलत्या वातावरणामुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे गॅसचा त्रास उद्भवतो. दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. बीट रोज खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *