गॉसिप कल्ला - अभिनेत्री अमिषा पटेलचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
News24सह्याद्री - अभिनेत्री अमिषा पटेलचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक..पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
1. अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीची NCBकडून चौकशी
नोव्हेंबर महिन्यात NCBने अर्जुन रामपालच्या घरी छापा हि टाकला होता. त्यावेळी अर्जुन रामपालच्या घरी NCBच्या अधिकाऱ्यांना NDPC अॅक्टनुसार प्रतिबंध असलेली औषधं मिळाली होती. त्यानुसारच हि कारवाई करण्यात आलीय.
2. अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच अडकणार लग्नबंधनात
अभिज्ञाचा हळदीचा सोहळा नुकताच पार पडलाय. या सोहळ्याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर नुकतेच पोस्ट केले आहेत. अभिज्ञा उद्योजक मेहुल पै याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे . मेहुल आणि अभिज्ञा गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात येत्या ७ जानेवारी ला अभिज्ञा आणि मेहुलचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
3. बिग बींच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा
बॉॉलिवूडचे महानायक असलेले अमिताभ बच्चन यांनी थंडीविषयी एक ट्विट केलं असून सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल आहे. त्यांच्या आगामी चित्रपटासाठी ते लडाखला गेले होते. मात्र, तिथल्या हाडं गोठावणाऱ्या थंडीमुळे त्यांना परतावं लागलं आहे. या सेटवरील एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
4. अभिनेत्री अमिषा पटेलचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
सर्व इंस्टाग्रामकडून आल्याच भासवल जात होत, या लिंक वर क्लिक केलं असता अमिषा यांच अकाउंट लॉक झालं, हे काहीतरी वेगळं असल्याची शंका अमिषा पटेलला आली आणि अमिषाने त्वरित सायबर सेलकडे धाव घेतली.
5. नवाजुद्दीन सिद्दिकीच्या उत्तराने चाहत्यांची निराशा
मुंबई शहर वाचवू शकणार का ? गणेश गायतोंडे याच्या कथेचं पुढे काय झालं असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिले होते, त्यामुळेच अनेकांना सेक्रेड गेम्स ३ येईल अशी आशा होती. पण नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या उत्तराने मात्र चाहत्यांची निराशाच केलीय. या वेब सीरिजचा तिसरा भाग येणार नसल्याचं त्याने सांगितल्याने आता चाहत्यांची निराशा झालीय.
No comments
Post a Comment