Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - दक्षिणस्टार विजय सेतुपतीच्या सिनेमासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी

No comments

               News24सह्याद्री -  दक्षिणस्टार विजय सेतुपतीच्या सिनेमासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी....पहा गॉसिप कल्लाTOP HEADLINES

१. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन व नताशा दलाल अडकणार लग्नबंधनात 
 लग्न पंजाबी चालीरितीप्रमाणे होणार असून  200 लोक या लग्नाला हजेरी लावणार  आहेत.  अलीकडेच वरुण धवन यासंदर्भात अलिबागमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचला होता. या जोडप्याचे काही खास फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लवकरच हे देखील जोडपे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची खुशखबर देणार आहे.  

२.दक्षिणस्टार विजय सेतुपतीच्या सिनेमासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी 
 'विजय द मास्टर' हा सिनेमा देशभरातील 3800 स्क्रीन्सवर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासाठी टॉकीजमधील 50 टक्के क्षमतेचाच वापर केला जात असून या नियमानंतरही सर्व तिकीटं विकली गेली आहे. यावरुनच  या सिनेमाची किती जबरदस्त कमाई होणार आहे, याचा अंदाज लावला जातोय. 

३.अभिनेता मोहसिन खान ने खरेदी केले नवीन घर   
मोहसिनने हे नवे घर कुठे खरेदी केले आहे हेअजून  स्पष्ट झालेलं नाही. मात्र  सोशल मीडियावर त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

४.भजनसम्राट अनुप जलोटा यांच चित्रपट क्षेत्रात पदार्पण 
अनुप जलोटा यांनी  सत्य साई बाबांसारखा गेटअप करून काही फोटो ही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटोत अनूप जलोटा हे हुबेहुब सत्य साई बाबांसारखे दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन  विक्की रनौत हे करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले असून आता अनूप जलोटाच्या या लूकची खूप चर्चा ही  रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 

५.पुण्याच्या आर्यची "टॉप 8' मध्ये निवड
 स्पर्धेत विविध प्रकारांतील नृत्य सादर करणाऱ्या आर्यचे सर्व स्तरातून  कौतुक  होत आहे. आर्य डोंगरेहा  ओम ऍकॅडमीचा विद्यार्थी असून, सध्या तो नृत्यप्रशिक्षक म्हणून देखील काम करतो. यापुढे देखील विविध नृत्यप्रकार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा आणि 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'चा किताब पटकावण्याचा मानस आहे. लहानपणापासून मी नृत्याचे शिक्षण घेत असून, माझे गुरू ओंकार शिंदे यांचाही सार्थ अभिमान असल्याचे आर्यने यावेळी सांगितलय.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *