Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार

No comments

  News24सह्याद्री कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार..पहा गॉसिप कल्ला


TOP HEADLINES


1. करण जोहर करणार मोठ्या चित्रपटाची घोषणा

दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करणार आहे. सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. चित्रपट माफियाच्या नावाखाली त्याला जोरदार टार्गेट करण्यात आले होते. पण आता सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत करण त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे.  चित्रपटाचे पोस्टर आणि फस्ट लूक आज प्रदर्शित करणार येणार असून आता करण नेमक्या कोणत्या चित्रपटाची घोषणा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

२.सुरभीच्या ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ 
अभिनेत्री सुरभी चंदना छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. यावेळी ती साडीवर केलेल्या आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. सुरभीनने  २००९ साली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं, ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. काही तासांत लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या ती एकता कपूरच्या  'नागिन' या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे. 

३.कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. आता यासंदर्भात एक मोठी बातमी येत आहे. हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो असे सांगितले जात आहे.  22 नोव्हेंबरला चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि शूटिंग डिसेंबरमध्ये 10 दिवसात पूर्ण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राम माधवानी हे लवकरात लवकर चित्रपट रिलीज करणार आहेत. 

.दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या 'लाइगर' चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर
तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध स्टार विजय देवेराकोंडा हा अभिनेत्री  अनन्या पांडे  सोबत पहिल्यांदाच  'लाइगर' या चित्रपटात दिसणार आहे. नुकताचं निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लुक प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्याचा दमदार लूक दिसत आहे. पहिल्या लूकमध्ये विजय बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातलेले पाहायला मिळत आहेत. तसचे त्यांच्या मागे सिंहाचा फोटो दिसत आहे. जगन्नाथ पुरी  यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून  विजय आणि अनन्यासोबत या चित्रपटात राम्या कृष्णन, रोनित रॉय, विशु रेड्डी, आली आणि गेटअप श्रीनु हेदेखील पाहायला मिळणार आहेत.

अभिनेत्री मानसी नाईक विवाहबंधनात अडकणार
मराठी अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी लगीन घाई सुरू झाली असून नुकतेच तिने घरी ग्रहमख पूजा केली असून पूजेचे फोटो शअेर केलेत. या फोटोमध्ये मानसी अत्यंत सुंदर दिसत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. मानसी आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय मॉडेल आणि अभिनेताही आहे.  ग्रहमख या विधीपासूनच मानसीच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून  मानसीच्या चाहत्यांनी  तिला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा  दिल्या आहेत.No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *