Breaking News

1/breakingnews/recent

14 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

     News24सह्याद्री - कोविडबाधित मतदारांनाही  करता येणार मतदान....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेटTOP HEADLINES


1. यंदाची संक्रांत महागाईमुळे कडवटली  
बाजारपेठा सजल्या असून बाजारात नागरिकांचीसुद्धा गर्दी पाहायला मिळाली. पण या वर्षी तीळ आणि गुळाच्या किमती वाढल्याने सामान्यांची संक्रांत महागाईने कडवट केली आहे.

2. भारत-पाकिस्तान सीमेवर आढळला १५० मीटर लांब बोगदा
 भारत-पाकिस्तान सीमेवरील कठुआ येथील हिरानगर सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांना एक १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला आहे. या बोगद्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न, जगासमोर उघड झाले आहेत.  

3.  राज्यात 358 लसीकरण केंद्र
 केंद्र मुंबईत असून त्या पाठोपाठ पुणे  ठाणे या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी 1 लाख 39 हजार 500 तर पुण्यासाठी 1 लाख 13 हजार डोसेस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  

4. अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा 
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर करा या मागणीवरुन कोल्हे यांनी भाजपने सत्तेत असताना 5 वर्ष संभाजी महाराजांच्या नावासाठी काय केले असे म्हणत औरंगाबादचे संभाजीनगर करा हा मुद्दा कोण उचलतेय हे पाहून मला फार अप्रूप वाटतेय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

5. कोविडबाधित मतदारांनाही  करता येणार मतदान
 मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.  

6. बंदर विकासासाठी ३०० कोटी
त्या कामासाठी ३०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव  तयार केला जात आहे. सात ते आठ महिन्यांत प्रस्ताव तयार होईल, अशी  माहिती  राज्य शासनाच्या वतीने मच्छीमारांना देण्यात आली.

7. भातविक्रीसाठी शेतकऱ्यांची १५ किलोमीटरची पायपीट
 गावातील ७५०० शेतकऱ्यांना आपल्या भात विक्रीसाठी १५ किलोमीटरची पायपीट करून शहापूर, विक्रमगड मतदारसंघातील भातखरेदी केंद्रावर जाण्याची वेळ आली आहे.  

8. ग्रामीण रूग्णालयातील  इलेक्ट्रिकल साहित्यांची  चोरी  
चोरटे हे पाठीमागील भिंतीवरील कुंपण तोडून आत आले होते. फॅन, वायर, बल्ब, ट्यूब लाईट अशा प्रकारच्या अनेक इलेक्ट्रिकल वस्तू येथून चोरीला गेल्याचे दिसत आहेत.  

9. संक्रातीच्या  खरेदीसाठी महिलांची गर्दी 
विशेषत: वाणाचे साहित्य, साड्या, बांगड्या, हळदी-कुंकू, बोळके, तीळ, गुळ, तिळाचा हलवा खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी बाजारात  पाहायला मिळतिये   

10. केमीकल चा टँकर सोडुन पळुन जाणा-यावर कारवाई करा 
काल पुन्हां तो टँकर शहाड गाव शेजारी सेच्युरी रेयॉन रुग्णांंलयाच्या समोरील हायवेवर सापडला  असुन त्या टँकर मालकावर व चालकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी सेंंच्युरी रेयॉन कंपनीचे सुरक्षा विभागाचे असिस्टंट जनरल मँनेजर एस.के.शिंदे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात व उल्हासनगर महानगरपालिका उपायुक्त मदन सोंडे प्रदुषण मंडळाचे अधीकारी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *