Breaking News

1/breakingnews/recent

13 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

    News24सह्याद्री - सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीची दुसरी खेप पुण्याहून रवाना....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. तीनही कृषी कायद्यांची होळी करत शेतकरी साजरी करणार लोहडी
न्यायालयाने चार सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. मात्र शेतकरी संघटनांनी कालच स्पष्ट केलं होतं की, कायद्यांच्या स्थगितीचं आम्ही स्वागत करु, पण कोणत्याही समितीसमोर हजर होणार नाही. तसेच आपण आपलं आंदोलन सुरु ठेवणार असल्याचंही स्पष्ट त्यांनी केलंय. आज संध्याकाळी शेतकरी तिनही शेतकरी कायद्यांची प्रत जाळून लोहडी साजरी करणार आहेत.  

2. सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीची दुसरी खेप पुण्याहून रवाना
पुण्याच्या सीरम इनस्टिट्यूटमधून लसीच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. कोरोना लस देशातील वेगवेगळ्या भागात पोहोचवली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीची दुसरी खेप पुण्याहून काल रात्री रवाना झाली. या दुसऱ्या खेपेत लसीचे 6 कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमधून पाठवण्यात आले. 

3. कृती समीतीचे उल्हासनगरात काम बंद आंदोलन
 उपमहापौर भगवान भालेराव,मनपा आयुक्त डॉ.राजा दयानिधी, उपायुक्त दिपक सोंडे,यांच्या सोबत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021च्या पगारात सातवा वेतन देणार असल्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले  

4. ठाकुर्लीतील हॉटेल मध्ये कुकरचा स्फोट
 कलाई सल्वन असे जखमी इसमाच् नाव असून  याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

5. ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार - देठे 
 ग्रामपंयायतीमध्ये सुरु आहे. यावर ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कारवाही व्हावी आणि त्यांचे पद रद्द व्हावे यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सुभाष देठे यांनी सांगीतले.  

6. प्रचारादरम्यान मतदारांना पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करा 
उमेदवारांनी मतदारांना पैसे व निवडणुकांचे पत्रक वाटप  करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या निंदनीय प्रकाराची तहसीलदार यांनी दखल घेऊन या सर्व उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेतून बेदखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

7. वाहनात गॅस भरत असताना दोन आरोपींना अटक
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पथकाने छापा टाकत धीरज वानखडे, संजय लाड यांना अटक केलीये आणि त्यांच्या कडून 9 सिलिंडर, तीन मशीन्स, एक मारुती ओमनी आणि 1 लाख 87 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले.

8. तलवार बाळगणाऱ्या परप्रांतीय ट्रकचालका कडून तलवार जप्त
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात संपर्क साधुन या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळताच या प्रकरणी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लघन करुन तलवार बाळगणाºया या ट्रक चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

9. दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार तर चार जखमी
 दोन दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन गंभीर जखमींना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

10. श्री सिध्दीविनायक गणपती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा संपन्न
प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन झाले व दुसऱ्या दिवशी महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *