Breaking News

1/breakingnews/recent

10 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES


1. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गो- एअरच्या वैमानिकाची आक्षेपार्ह टिप्पणी 
नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य केलं होतं. वैमानिकाचं ट्वीट गो एअरच्या निदर्शनास आल्यानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकलं.  

2. मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा; दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची करणार पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार आहे. आज दुपारी १२ वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांची भेट घेणार आहेत 

3. कोरोनाच्या काळात होणाऱ्या सिद्धेश्वरांच्या यात्रेवर निर्बंध
सर्वसामान्य नागरिकांना यात्रा काळात मंदिरात प्रवेश बंद असणार आहे. 12 जानेवारी पासून 16 जानेवारी पर्यंत सिद्धेश्वरांच्या यात्रेच्या प्रमुख धार्मिक विधी पार पडत असतात. मात्र या धार्मिक विधींवर देखील प्रशासनातर्फे मर्यादा घालण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत पालिकेच्या आयुक्तांना सूचना करण्यात आल्या आहेत.

4. खासगी आणि सरकारी रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्यात येणार - अमित देशमुख
 ऑडिट केले  शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. तसेच  या सेफ्टी ॲाडिटसाठी एखादी टीम नेमली जाणार आहे. यासाठी सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले.  

5. अंबरनाथच्या छाया रुग्णांंलयात डॉक्टरांची मनमानी
महिलांनी याबाबत विचारपूस केली असता डॉक्टर,नर्स,परिचारिका व संबंधीत विभागाचे कर्मचारी त्यांना उडवाउडवीची उत्तर देवुन परत पाठवतात. त्यामुळे महीला कमालीच्या त्रस्त झाल्या असून रुग्णांंलयात लसीकरण विभागात कर्मचारी व डॉक्टर उपलब्ध करुन देण्याची मागणी महीला करत आहेत.

6. भरवस्तीत दरोड्याचा प्रयत्न 
मोबाईलद्वारे चोरट्याचा माग काढत पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली. तर या तिघांमधील एक आरोपी याच इमारतीमध्ये राहत असून त्याने चोरीचा डाव आखल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. चेतन मकवना ,अब्दुल शेख, दिनेश रावल असे तिघा आरोपींची नावे आहेत.

7. भंडारा नवजात अर्भकांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - वंचित बहुजन आघाडी
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येक कुटुंबाला दहा लाखाचे अर्थसहाय्य मंजूर करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहेय.

8. पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी चौकशी करून दोन्ही पक्षावर गुन्हे दाखल करतो असं म्हंटल्यावर आपल्या पतीवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्या महिलेने विष पिऊनआत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

9. महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा 
शिधापत्रिकाधारकेवर खोटी माहिती दिल्याप्रकरणी 199 ,200 प्रमाणे गुन्हा दाखल करून केलेल्या नुकसानाची भरपाई शिधापत्रिका धारकांच्या बँक खात्यातून कपात करण्यात यावी अशी मागणी  मराठवाडा जागरूक पत्रकार संघ विकास मंडळाचे संस्थापक सचिव नंदलाल गुप्ता यांनी केलीये

10. महिलांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रात
 बैठकीत महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी महाराष्ट्राची दावेदारी सादर केली. परंतु गतवर्षी रोहा येथे पुरुषांची वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रात झाली असल्याने यावेळी मात्र महिलांच्या राष्ट्रीय स्पध्रेचे यजमान देण्यात आले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *