Breaking News

1/breakingnews/recent

विराट व अनुष्का यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन; विराटने दिली आनंदाची बातमी

No comments

 


मुंबई -

विराटने दिली आनंदाची बातमी क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला आहे. आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचे हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली.

 यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असे आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली. ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचे सांगितले होते ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असे कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *