24 जानेवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - बारामतीत अजित पवार आणि शिवेंद्रराजेंची भेट...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
१. तोरणमाळ ला मजुरांचे वाहन उलटून ६ जण ठार
बचावकार्य सुरू असून जखमींना तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. याठिकाणी बचाव कार्य सुरू असून म्हसावद पोलीस घटनास्थळी पोहचले होते.
२. विवा’ होम्सचे मेहुल ठाकूर यांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारीपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आलीय.पीएमसी’ बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी १६० कोटी रुपये ‘विवा’ कंपनीत अवैधरीत्या वळविण्यात आल्याचा संशय ईडीला आला आहे.
३. ट्रकमधून १८ लाख रुपयांची वेलची लंपास
खंडाळा गावच्या हद्दीत खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर चहा पिण्यासाठी एका चहाच्या टपरीवर थांबलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी अठरा लाख रुपयांच्या वेलदोड्या चोरल्या आहेत. यावेळी अज्ञात चोरट्यांविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
४. गांजे गावच्या कन्येची भारतीय सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये निवड
शिल्पा पांडुरंग चिकणे असे या युवतीचे नाव आहे. विशेष म्हणजे शिल्पा ही सैन्य दलात भरती होणारी तालुक्यातील पहिली युवती आहे. शिल्पाच्या या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.
५ . संभाजी भिडेंनी सांगितलं शिवसेनेचे महत्व
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथे एका चौकाचे नामकरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे सांगितलं आहे.
६. नायब तहसीलदार-तलाठ्यावर चाकू हल्ला
हल्यात नायब तहसीलदार वैभव पवार यांच्या पोटावर चाकूचे वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. तर तलाठी गजानन सुरोसे यांनाही दुखापत झाली आहे.
७. विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजली
जवळपास दोन लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. पंढरपूरच्या विठोबा मंदिरातील ऑनलाईन पास नोंदणी पद्धत रद्द केल्याचा परिणाम भाविकांची संख्या वाढण्यात झाल्याचं पाहायला मिळतेय.
८. बारामतीत अजित पवार आणि शिवेंद्रराजेंची भेट
अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यात गेल्या महिनाभरात झालेली ही तिसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
९. कळमनुरीत बर्ड फ्लूचा शिरकाव
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पिंपरी खुर्द परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त एम.एन. आठवले त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गावातील 187 कोंबड्यांना दयामरण दिलय.
१०. २६ जानेवारीला किसान सभेचा मोर्चा राजभवनावर धडकणार
26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलाय.
No comments
Post a Comment