Breaking News

1/breakingnews/recent

18 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

         News24सह्याद्री - अज्ञात टँकर मालक,व चालकावर गुंंन्हा दाखल....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES

१. डोंबिवली मध्ये कॉंग्रेसचे शिबिर,नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !
 एसटी महामंडळाच्या बसचा चार हजार किमी पर्यंतचा प्रवास ज्येष्ठांना मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठीची नाव नोंदणी रविवारी करण्यात आली. तसेच नेत्रतपासणी व मतदार नोंदणी व ओळखपत्र काढण्यासाठीही नागरिकांनी रांग लावली होती. पाचशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती यावेळी प्रणव केणे यांनी दिली.

 2. डोंबिवलीमध्ये पालिकेच्या शास्त्री रुग्णालयाची दुरावस्था !
खर्च होत असलेले पैसे हे पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांसाठी वापरावा अशी मागणी मनसे करत होती आणि आता  कोविड लस देताना शास्त्री नगर रुग्णालयातील वेटिंग रूम ची दुरावस्था झाली असलेले फोटो आणि  व्हीडिओ मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट केला असून याप्रकरणी टीका देखील केली आहे.

 3. बीएसएफ जवानाला अखेरचा निरोप 
अकोल्यातील जवाहर नगर येथील रहिवासी bsf  जवान पराग भास्करराव महल्ले  यांचे  १६ जानेवारी रोजी दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी मोठी उमरी येथील स्मशान भूमित शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेय. यावेळी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी,जवाहर नगरातील नागरिक तसेच कुटुंबीयांनी अत्यंत भाऊक वातावरणात पराग महल्ले यांना अखेरचा निरोप दिलाय.

4. अज्ञात टँकर मालक,व चालकावर गुंंन्हा दाखल.
उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुंंन्हा दाखल करण्यात आला आहे.लवकरच त्या फरारी आरोपीला अटक करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले;

5. काटेपुर्णा धरणात आढळला युवकाचा मृतदेह 
 स्ट्रेचर सिस्टम ने बाहेर आणले यावेळी ठाणेदार महादेव पडघान,पोलीस कर्मचारी,व नातेवाईक हजर होते. सदर मृतदेह हा नागेश मधुकर पाटील  रा.मोरझाडी ता.बाळापुर जिल्हा अकोला येथील असल्याचे समजते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे  

6. विश्रान्ती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत 
 ट्रॅक चालकाचा गाडीवरचा अचानक ताबा सुटुन ट्रक समोरील बाजुच्या डीव्हायडरला धडकुन पलटी झाला.पघातात ट्रक चे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत ..पोलीस त्या रीक्षा चालकाचा शोध घेत आहेत.  

7. अकोल्यात ग्रामपंचायतीच्या मतमोजणी दरम्यांनं, एका व्यक्तिवर प्राणघातक हल्ला 
धनंजय मुंडे यांच्या गटाला मोठ यश लाभलं असून इथल्या ७ पैकी ६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे.यांपैकी एक जागा ही भाजपाला मिळाली आहे. कथीत बलात्कार प्रकरणावरुन समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाही त्यांच्यावरच परळीकरांनी विश्वास दाखवला आहे.  

8. महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय;- आदित्य ठाकरे 
राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला निकाल सकाळी पावणे नऊच्या सुमारास जाहीर झाला. हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलने पाडळी गावात विजय मिळवला.

9. सुप्रिया सुळे ‘‘तुम्हीच हे करू शकता,’’- विक्रम काळे
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासमोरच मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी स्वत:सह पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी अशी आग्रही मागणी केली. ‘‘तुम्हीच हे करू शकता,’’ असे विधानही काळे यांनी केले.  

10. सुप्रिया सुळे ‘‘तुम्हीच हे करू शकता,’’- विक्रम काळे
भाजपमधील पक्षीय पातळीवरील धोरणाचे उदाहरण व अडीच वर्षांनंतर राज्याच्या मंत्रिमंडळातही खांदेपालट करता येण्यासारख्या विचारांची मांडणीही केली जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासमोरच मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी स्वत:सह पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी अशी आग्रही मागणी केली. ‘‘तुम्हीच हे करू शकता,’’ असे विधानही काळे यांनी केले.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *