Breaking News

1/breakingnews/recent

14 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

     News24सह्याद्री - जालन्यात एका महिलेवर चाकूचे वार करत डाव्या कालव्यात फेकले...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES

1. ‘इंडियन एअर फोर्स’ अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी
उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांचा संच तयार करावा. त्यामुळे फॉर्म भरताना दस्तऐवजाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही  

2. धनंजय मुंडे प्रकरणात मी काही बोलणार नाही - जयंत पाटील
 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील  यांनी केले. मात्र, माझा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

3. लोकलमधून पतीने ढकलल्याने 26 वर्षीय महिलेचा मृत्यू
लोकलच्या हार्बर मार्गावरील चेंबूर आणि गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी महिलेचा पती अनवर अली शेखला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्याने हे कृत्य का केलं हे अद्याप समजू शकलेलं नाही.  

4. 16 जानेवारीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणाला प्रारंभ 
 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण केले जाणार आहे.

5. आ.डॉ.बालाजी किणीकर यांनी केला शिधावाटप कार्यालयाचा पाहणी दौरा
 अंध,अपंग,कुष्ठरोगी यांना तातडीने शिधापत्रिका देण्यात यावी, शिधावाटप दुकानदारांकडून होत असलेला धान्याचा काळाबाजार थांबविण्यात यावा, तक्रारी प्राप्त झाल्यास त्याच्यावर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी.अशा विविध विषयांवर आमदार डॉ किणीकर अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या 

6. नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरुवात
शहरात काही धनाढ्य भूमाफियांनी अशाप्रकारे अतिक्रमण करून ती जमीन दुसऱ्यांना विक्री करून चांगलीच माया जमवली आहे आता त्यांचे प्रकरण समोर येणार या भीतीने भूमाफिया मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

7. भाजपला राजीनामा देण्याबद्दल बोलण्याची गरज नाही - राज्यमंत्री अब्दुल सत्तार
विरोधकांनी त्यांवर भाष्य करू नये. असे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी केले. जालना येथे शिवसेना मेळावा झाला या प्रसंगी ते बोलत होते 

8. अकोल्यात चायना मांज्याविरोधात शहर पोलिसांची कारवाई 
घरातील एका खोलीत मोठ्या प्रमाणात चायना मांजाचे भरून आलेले 22 बॉक्स त्यामध्ये 50 रील असा ऐवज जप्त करण्यात आला. तर काही पोत्यांमध्ये ही चायना मांजाच्या रील मिळून आल्या आहेत. हा मांजा दिल्ली येथून आणला होता. या कारवाईने चायना मांजाचे व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. 

9. जालन्यात एका महिलेवर चाकूचे वार करत डाव्या कालव्यात फेकले  
 पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक  व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन सदर महिलेला औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविले . या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे करत आहे.  

10. मुलगी आणि तिच्या आईचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक
 सदरच्या मुलीसोबत लग्न जुळले होते पण मुलाची वागणूक नीट नसल्याचे कारण देत मुलीच्या घरच्यांनी हे लग्न तोडले याच रागातून आरोपी तरुणाने आपल्या 05 साथीदारांच्या मदतीने या दोघींचे  अपहरण केले. याप्रकरणी रामकृष्ण भोयर आणि त्याच्या 02 साथीदारांना अटक केली असून तर इतर 03 साथीदार फरार आहेत.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *