कंगनाचे अभिनंदनच करायला हवे कारण, महाराष्ट्रद्रोही भाजप: कंगना-उर्मिला वादात रोहित पवारांची उडी
मुंबई -
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यामध्ये २०२० मध्ये झालेला शाब्दिक वाद चर्चेचा विषय होता. आता ह्या वादाने नवीन वळण घेतले आहे. आता २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघींमध्ये पन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. मात्र आता या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. कंगनाने भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली दिल्याचे तिच्या ट्विटवरुन सिद्ध होत असल्याचे सांगत रोहीत पवार यांनी महाराष्ट्रद्रोही भाजपाचा खरा चेहरा कंगनाने समोर आणल्याबद्दल तिचे अभिनंदन करायला हवे, असा टोला लगावला आहे.
कंगनाने उर्मिला यांना दिलेल्या रिप्लायचा स्क्रीनशॉर्ट शेअर कर रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपाचा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढे आणल्याबद्दल कंगना रणौतचे अभिनंदनच करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपाला काय शिक्षा घ्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल,असा रोहित पवार यांनी टोला यांनी लगावला आहे. कंगनाने उर्मिला यांच्यावर टीका करताना भाजपाला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण काँग्रेस ते तोडत आहे. भाजपाला खूश करुन माझ्या हातात फक्त २५-३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रसला खूश केले असते असे म्हटले आहे. यावरुनच रोहित पवार यांनी कंगनाने भाजपाला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली दिली आहे असे म्हटले आहे.

No comments
Post a Comment