Breaking News

1/breakingnews/recent

“टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका - संदीप देशपांडे

No comments



मुंबई -

टेस्ला कंपनीचे अखेर भारत मध्ये पदार्पण झाले आहे. जगातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामधील आघाडीची ऑटो कंपनी आहे. टेस्लाने भारतातील आपल्या व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूची निवड केली आहे. बहुचर्चित टेस्ला कंपनी महाराष्ट्राऐवजी बेंगळुरूमधून व्यवसायाला सुरूवात करणार आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले होते. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टेस्ला टीमशी झालेल्या चर्चेत आदित्य ठाकरेंनी टेस्लाला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले होते. तसेच केवळ गुंतवणूकीसाठी नाही तर भविष्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार करुन हे निमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले होते. आदित्य ठाकरेंच्या रिप्लाय देताना संदिप देशपांडे यांनी टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका” असेच आदित्य ठाकरेवर निशाणा साधला आहे. टेस्ला कंपनीने टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड नावाने बेंगळुरूमध्ये रजिस्ट्रेशन केले आहे. यासोबतच कंपनीने तीन डायरेक्टर्सचीही नियुक्ती केली आहे. टेस्ला भारतात लग्जरी इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन घेईल.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *