Breaking News

1/breakingnews/recent

राहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना शेतीमधले काय कळते ?- नारायण राणे यांचे यांचे वक्तव्य

No comments



मुंबई -

 भाजप नेते नारायण म्हणाले की शेतकऱ्यांच्या हिताचा हा नवा कृषी कायदा आहे. या कायद्याने सर्व बंधने काढून टाकली तर मग चुकले काय? का इथे आंदोलने होत आहे? ही राजकीय आंदोलने आहे. यात समेट होईल असे मला वाटत नाही. राहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना शेतीमधले काय कळते? काहीच कळत नसल्याने ते समर्थन कसे करणार? विरोधच करणार. अशा शब्दांमध्ये भाजापा नेते नारायण राणे यांनी आज कणकवली येथून काँग्रेस नेते राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर तोफ डागली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितित भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.असे नारायण राणे म्हणाले. यावेळी नारायण राणे म्हणाले पंतप्रधान मोदींकडून एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे व दुसऱ्या बाजूला नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. तसेच, या देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे.आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवले पाहिजे आर्थिक समृद्ध बनवले पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *