Breaking News

1/breakingnews/recent

आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार: संजय राऊतांचा इशारा

No commentsमुंबई -

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केल्याचा दावा आहे. शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेफाट आरोप केले आहे.  त्यातून काही निष्पन्न होणार नाही असे म्हटले आहे. तर याचवेळी त्यांनी आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार असल्याचे म्हटले आहे. 

ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहे  त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदे फडकावतात आणि आरोप करतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केले. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत. अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाही तर माझे नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितले आहे असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केले. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल वाईट प्रसिद्धी मिळावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही. संजय राऊत यांनी सुनावले ही कायद्याच्या पलीकडची भाषा असेल, पण मला आणि पक्षाला प्रतिष्ठा महत्वाची आहे. जे कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करत आहेत त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? पक्षाने आमचा या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही असं सांगावं. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही असे त्यांनी सांगावे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *