Breaking News

1/breakingnews/recent

भंडारा आग प्रकरणाबद्दल आरोग्य मंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती

No comments

 


मुंबई -

काही दिवसा पूर्वी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला अचानक आग लागली असता मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. तीन बालकांचा आगीमुळे तर सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले असता त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. 

भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील आगीचा रिपोर्ट आज (बुधवारी) येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गरज पडल्यास कॅबिनेटच्याही निदर्शनास हा रिपोर्ट नक्की आणून देऊ. भंडारा उपजिल्हा रुग्णालय जळीतप्रकरणाचा रिपोर्ट अजून आमच्या विभागाचे सचिव आणि आयुक्त यांच्यापर्यंत आलेला नाही. मात्र तो आज येईल. या रिपोर्टचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभाग स्तरावर केली जाईल. रिपोर्टमध्ये असलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षा होईल यात शंका नाही. मात्र ही सगळी व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन टोपे यांनी दिले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *