शहराची खबरबात - बनावट डिझेल प्रकरणात आता फसवणुकीचे कलम
News24सह्याद्री - बनावट डिझेल प्रकरणात आता फसवणुकीचे कलम....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. मनपात काँग्रेसचे जोरदार ठिय्या आंदोलन
मनपाने जाणीवपूर्वक होर्डिंग्ज हटविले नसल्याचा आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निषेधार्थ मनपामध्ये जिल्हाध्यक्ष किरण काळेयांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार ठिय्या आंदोलन केले. 2. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची शनिवारी आरोग्य तपासणी
कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या जेवणानंतर बारा तास म्हणजे सकाळी आठ वाजता उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी सदर तपासणी जिल्हाप्रमुख मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली
3. बनावट डिझेल प्रकरणात आता फसवणुकीचे कलम
बनावट डिझेलच्या संशयावरून दोन टँकर पकडले पोलिसांनी सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला प्रयोगशाळेतील तपासणीत पकडलेले डिझेल लाईट ओईल असल्याचे स्पष्ट झाले या ऑइल ची किंमत कमी असून ते औद्योगिक क्षेत्रासाठी वापरले जाते काळ्या बाजारात खरेदी करून हे ओईल आरोपी वाहनांसाठी विकत होते आता या प्रकरणात शासनाची फसवणूक झाल्याचे कलम तपासणी अधिकारी संदीप मिटके यांनी वाढवले आहे
4. बेकायदा रिक्षाचालकांचा सुळसुळाट
नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी संतापाची लाट उसळली आहे लवकरात लवकर हा प्रश्न नाही सुटला तर शहरातील विविध संघटना सुज्ञ नागरिक यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे
5. ट्रेनिंग सेंटर मधील वस्तूंची चोरी
शहरातील नगर औरंगाबाद रोडवरील सिक्यू एव्ही परिसरातील ट्रेनिंग सेंटर मधील हॉल मध्ये घुसून चोरट्यांनी आठ हजार पाचशे रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरून नेल्या एक ते चार जानेवारी दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सत्यवीर रतनलाल सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस पोलीस नाईक गाडीलकर करत आहेत
No comments
Post a Comment