जिल्ह्याची खबरबात - काळे, कोल्हे गटात शाब्दिक युद्धा नंतर आता पत्रकबाजीला सुरुवात
News24सह्याद्री - काळे, कोल्हे गटात शाब्दिक युद्धा नंतर आता पत्रकबाजीला सुरुवात...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. कान्हूरपठार येथे घरफोडी; १५ तोळे सोने लांबिवले
पोलिसांना माहिती कळल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते तसेच फिंगर प्रिंट घेण्यात आले असून पुढील तपास पो नि घनश्याम बळप हे करत आहेत
2. काळे, कोल्हे गटात शाब्दिक युद्धा नंतर आता पत्रकबाजीला सुरुवात
भाजपा शिवसेनेच्या नगरसेवकांनी शहरातील विविध ठिकाणी जनजागृती फेरी काढून पत्रक वाटले. दरम्यान नगरपालिका निवडणूक जवळ आल्याने शहरात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रात्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत असून आता पत्रकबाजी सुरू झाल्याने सर्व सामान्य जनता मात्र संभ्रमात पडली आहे.
3. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर एकत्र येत मिरवणूक काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वांबोरीतील सात जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बराटे करत आहेत.
4. जिल्हा बँकेसाठी दोन लाखांची निवडणूक खर्च मर्यादा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 2 लाख रुपयांची निवडणूक खर्च मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर दिली.
5. तरूणांना लग्नाच्या नावाने फसवणारी टोळी गजाआड
पैशाच्या आमिषाने मुलींचे बनावट लग्न लावून देणारी टोळी श्रीरामपूर तालुक्यात सक्रिय झाली असून यातील काही महिलांना श्रीरामपूर तालुका पोलिसांनी जेरबंद केले. यात सामील असणाऱ्या आठ ते दहा लोकांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
6. अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी जीप पकडण्यात आली. या कारवाईत सुमारे सव्वा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संगमनेर तालुक्यात येऊन पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली
7. मका खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याची मागणी
केंद्र सुरु करावेत हमीभावापेक्षा कमी दरात मका खरेदी करणाऱ्या खाजगी व्यापाऱ्यांवर कारवाई करावी त्याचप्रमाणे उपबाजार समिती उपलब्ध करून द्यावी इत्यादी मागण्यांसाठी राहता तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
8. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा आ. रोहित पवारांकडून सत्कार
आ.रोहित पवार यांच्या हस्ते जामखेड येथील मंगल कार्यालयात करण्यात आला यावेळी जामखेड पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे.,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे,कर्जत जामखेड मतदार संघाचे अध्यक्ष मधुकर राळेभात ,बापुसाहेब शिंदे. व तालुक्यातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
9. मतमोजणी परिसरातील कचरा सामाजिक संघटनांनी केला गोळा
सामाजिक संघटनानी ही बाब लक्षात घेऊन मंगळवारी या भागात येऊन श्रमदान करत परिसर स्वच्छ केला. नंतर सर्वानी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांनी स्वच्छता अॅप डाउनलोड करावे व त्यावरून थेट कचऱ्यासंदर्भात तक्रार करावी, माझी वसुंधरा या वेबसाइटवरून वैयक्तिक शपथ घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
10. दर्शन पास खाजगी व्यक्ती अथवा संकेतस्थळावरून घेऊ नये
खाजगी व्यक्ती कडून अथवा संकेत स्थळावरून दर्शन पास घेऊ नये असे पाच घेणे अनुचित असून ते देखील नाही यामुळे आपली फसवणूक होणार असून अशा गोष्टी लक्षात आल्यास त्याची माहिती हेल्पलाईनवर देण्यात यावी असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी च्या वतीने करण्यात आले
No comments
Post a Comment