जिल्ह्याची खबरबात - विहिरीत उडी मारून तरुणाची आत्महत्या
News24सह्याद्री - विहिरीत उडी मारून तरुणाची आत्महत्या...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या साडेआठशेच्या आत
जिल्ह्यात गेल्या 24 तासात नवीन 129 कोरोना बाधितांची भर पडली तर दोनशे रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67 हजार 916 इतकी असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 30 टक्क्यांवर पोहोचला आहे तर नवीन रुग्ण वाढल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 831 इतकी आहे
==============
2. तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू
केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने तूर खरेदीसाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरी नोंदणी 28 डिसेंबर 2020 पासून जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित पाथर्डी या संस्थेमार्फत सुरू करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय पालवे यांनी दिली
==============
3. शेळी चोराला मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
शेळी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करणाऱ्या सात जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहुरी तालुक्यातील पिंपळाचा मळा परिसरात घडलाय या घटनेत नंदू शिसाने जखमी झाला आहे याप्रकरणी कॉन्स्टेबल डावखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामदास म्हेत्रे व इतर सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे करत आहेत

4. अवकाळी पावसाने पिके आजारी
यंदा समाधानकारक पाऊस झाला परंतु सध्याचे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात अवकाळी हलक्या सरी बरसल्या यंदा वरुणराजाने कृपा केल्याने सरासरी 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस जिल्ह्यात झाला आहे त्यामुळे पिके ही चांगली आली परंतु वेळोवेळी होणाऱ्या पावसामुळे शेतकर्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले जात आहे
==============
5. पंथविक्रेत्यांना डिजिटल साधने वापराचे प्रशिक्षण
शहरातील पथविक्रेत्यांना कोपरगाव नगर परिषदेच्यावतीने डिजिटल या मोहिमेअंतर्गत डिजिटल आर्थिक साधने वापरण्याचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत कर्ज वितरित झालेल्या लाभार्थ्यांसाठी डिजिटल आर्थिक साधने वापरण्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते या प्रशिक्षणात सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत वितरीत केलेल्या एकूण वीस लाभार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले
==============
6. हद्दपार करण्यात आलेला आरोपी पोलीसांच्या ताब्यात
अहमदनगर जिल्ह्यातून २ वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलेला आरोपी परशुराम खराडे हा कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता शहरात दाखल झाला होता म्हणून तोपखाना पॉलिसिसन्नी कार्यवाही करत त्याला ताब्यात घेतले
=============
7. लवकरात लवकर कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल
कर्जत-जामखेड मतदारसंघातील लोकांना पिण्यासाठी व वापरासाठी पाणी विकत घ्यावे लागते हे मोठे दुर्दैव आहे. लवकरात लवकर कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल तसेच शहरातील सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन करून जामखेडची जीवनवाहिनी विंचरणा नदीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. नागरीकांनी नदीमध्ये प्लास्टिक व कसलीही कचरा टाकू नये स्वच्छतेच्या बाबतीत आपण शेवटून पाचवे आता प्रथम क्रमांक आणावयाचा आहे असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी केले.
================

8. ट्रक अपघातात अडकलेला चालक सुखरूप
कोपरगाव शहरातील पुणतांबा फाट्याजवळ हॉटेल साई समोर उभ्या असलेल्या टँकर ला जोरात धडक दिल्याने दोन्ही वाहन पलटी झ्हाल्याची घटना घडली या अपघातात मिक्सर मशीन चा ट्रॅक चालक केबिन मध्ये अडकल्याने शहर पॉलिसिसन्नी आणि स्थानिक नागरिकांनी डिड तास रेस्क्यू ऑप्रेशन करून चालकाला बाहेर काढले

9. सोनू सूद साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत
आज अभिनेता सोनू सूद यांनी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. यावेळी सोनू सूद आपल्या कुटुंबासोबत बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी सोनू सूद यांनी बाबांच्या दर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. यावेळी लॉकडाऊन च्या काळात त्यांनी मदत केली होती यावर सोनू म्हणाले, ‘जितका मोठा परिवार जबाबदारी इतकीच मोठी असते. तर हे काम साईबाबांच्या आशीर्वादाने झाल्याच त्यांनी म्हटल. तर यावेळी सोनुने शिर्डीतील वृद्धाश्रमाला भेट दिली.
==============
10. विहिरीत उडी मारून तरुणाची आत्महत्या
अमोल विश्वनाथ मोरे या ३१ वर्षीय युवकाने जामखेड येथील साहारा हाँटेल च्या समोर मंदिराच्या पाठीमागील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली त्याचा विहिरीत मृत देह आढळून आल्याने जामखेड मध्ये एकच खळबळ उडाली होती या घटनेची माहिती बाफना यांनी जामखेड पोलीस स्टेशनला व सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांना कळवली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृत्यूदेह विहिरीच्या बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आला आहे आत्महत्या का केली हे कारण मात्र समजु शकले नाही.या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलिस करीत आहेत. या घटनेची माहिती पाटोदा गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
===============

No comments
Post a Comment