Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - अहमदनगर जिल्ह्यावर आता बर्ड फ्लूचे संकट

No comments

      News24सह्याद्री  - अहमदनगर जिल्ह्यावर आता बर्ड फ्लूचे संकट...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES


1. ग्रामपंचायत उमेदवारांचे भविष्य मतमोजणी यंत्रात बंद
तालुक्यातील काही अपवाद सोडता ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.

2. भ्रष्टाचाराचा वास येत असल्यानेच सर्व विषयांना नामंजुरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक व  पदाधिकाऱ्यांनी भाजपा-सेना नगरसेवकांवर शहर विकासाला खीळ घालण्याचे आरोप करत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते, त्यानंतर भाजपा शिवसेना नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून भ्रष्टाचाराचा वास येत असल्यानेच सर्व विषय नामंजूर केल्याच म्हटलंय

3. जामखेड तालुक्यात  82.47 % मतदान
जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठींची मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. याठिकाणी एकुण 82.47 % मतदान झाले आहे. उमेदवाराचे भवितव्य आता  ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले असून  18 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.

4.  निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केली उमेदवारी जाहीर
नगरसेविका नीता अजिनाथ कचरे यांच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सभामंडपाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी आगामी नगर पंचायत निवडणुकीत या प्रभागाच्या उमेदवार निता कचरे याच असतील असे  प्रा .राम शिंदे  यांनी जाहीर सभेत सांगत निता कचरे  यांची उमेदवारीच थेट  जाहीर केली.

5. अहमदनगर जिल्ह्यावर आता बर्ड फ्लूयुचे संकट
राज्यातील काही ठिकाणी कोंबड्याना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या ठिकाणचे प्रशासन अ‍ॅलर्ट झालं असून राज्य शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

6. वीज बिल माफीसाठी आपचे 'चड्डी-बनियन' आंदोलन
शेतकरी व्यापारी, संघटित व असंघटित कामगार यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे.   याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेऊन सरसगट कोरोना काळातील विज बिल माप करावे, असे आपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

7. दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी छापा टाकत तिघांना ताब्यात घेतलाय तर पाच जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले त्यांच्याकडून दरोड्यात  वापरल जाणारे साहित्य जप्त करण्यात आलं

8. ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू
 रेल्वे मालधक्क्यात मालगाडीतून ट्रॅक्टर उतरवत असताना, ट्रॅक्टरचे चाक अंगावरून जाऊन अल्पवयीन मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलास जोखीमच्या कामावर नियुक्त केल्याने  कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.  अमोल सदाशिव घोलवड  असे मृत चालकाचे नाव आहे.  

9. अंत्यविधीसाठी मोफत सरपण देणार
माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे व सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

10. कर्जतच्या स्वच्छता अभियानात माजी मंत्री राम शिंदे यांचा सहभाग
 कर्जत शहरात स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा या अंतर्गत गेल्या १०४ दिवसांपासून स्वच्छतेचा महाजागर सुरू आहे त्यानिमित्ताने माजीमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी सर्व सामाजिक संघटनांनी सुरू ठेवलेल्या कामात सहभाग घेतला

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *