Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणा-या शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल वाटप

No comments

         News24सह्याद्री - ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणा-या शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल वाटप...पहा जिल्ह्याची खबरबात



TOP HEADLINES

1. ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणा-या शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल वाटप
सोनू सुदच्या कोपरगावच्या  मित्राने विद्यार्थ्यांची अडचण सोनुला सांगितल्यानंतर त्याने शिर्डीत साईदर्शनानंतर थेट कोपरगाव गाठले आणी या मुलांना मोबाईलचे वाटप केलेय.  विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे. ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणं गरजेचं असल्याचं सोनू सुदने यावेळी म्हटलंय

2. शेवगांव शहरवासीयांना मिळते दहा ते बारा दिवसांनी पाणी
मुख्याधिकारी दीर्घ रजेवर आहेत. सर्वसामन्य शेवगावकरांनी न्याय कोणाला मागायचा हा एक प्रश्न याठिकाणी उपस्थित होतोय  त्यामुळे शेवगांव शहराची होऊ घातलेली निवडणुक ही शेवगावच्या पाणी प्रश्नावर होईल अस बोललं जातंय .

3. काळविटाची शिकार केल्याप्रकरणी एकास अटक  
 वनविभागाच्या कारवाईची चाहुल लागताच आरोपीने पलायन केले. मात्र त्याच्या घरातून वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी दुचाकी, काळविट मारण्यासाठी वापरलेली कुर्‍हाड, सुरे, हरिण धरण्यासाठी वापरलेले जाळे असे साहित्य जप्त केले आहे.  

4. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन तरुण जागीच
पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अपघातात पवन खरात जागेवरच ठार झालाय तर अजय वाळून हा गंभीर जखमी असल्याने त्याला ताबडतोब उपचारासाठी दौंड येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली

5. विधानसभा निवडणुकीत केलेला भुलभुलय्या या निवडणुकीत चालणार नाही  
ग्रामपंचायत निवडणुकीत चालणार नाही असा टोला माजीमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना नाव न घेता लगावला खडक ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राम शिंदे यांच्या हस्ते फोडला व गावात भव्य रॅली काढण्यात आली यावेळी ते बोलत होते

6. राहुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगारास अटक  
जातेगाव इथं राहणाऱ्या  गोरख चव्हाण  यांच्या घरातून दोन महागडे मोबाईल चोरी गेल्याची फिर्याद राहुरी पोलिस स्टेशनला नोंदवण्यात अली होती यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यांचं शोध घेतला असता गोरख बर्डे यास अटक करून त्याच्याकडून चोरी गेलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले.

7. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी घेतले साईदर्शन
घडलेल्या घटने साठी जबाबदार व्यक्तींवर तातडीने कारवाई करू तसेच याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा झाली असून ते घटनास्थळी भेट देणार असल्याचेही प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितले

8. अवैध दारूसाठा पकडला
पोलिसांनी जप्त केला असून आरोपी संजय कारले विरुद्ध अवैध दारुविक्रीचा  गुन्हा दाखल करण्यात आला.   साहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.  

9. दाढ खुर्द येथे सहा बिबट्यांचा धुडगूस
जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असण्याची शक्‍यता जाणकारांनी वर्तवली कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची आधी कळपात हल्ला करणारे हे सहा बिबटे जेरबंद करावे अशी मागणी दाढ खुर्द ग्रामस्थांनी केली

10. शेळी चोरणाऱ्या भामट्याला संतप्त जमावाकडून बेदम मारहाण  
राहुरी शहर हद्दीतील पिंपळाचा मळा परिसरात नंदू परसराम ससाणे हा शेळी चोरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याला काही जणांनी रंगेहाथ पकडले. संतप्त झालेल्या जमावाकडून त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक मधूकर शिंदे हे करीत आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *