जिल्ह्याची खबरबात - निवडणूक निकालानंतर हाणामारी

News24सह्याद्री - निवडणूक निकालानंतर हाणामारी...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. जामखेड तालुक्यात आ. रोहित पवार यांचा करिश्मा
आमदार रोहित पवार यांचा करिश्मा ग्रामपंचायत निवडणुकीत चालल्याचं दिसून येतंय. जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा येथे भाजपाला धोबीपछाड देण्यात राष्ट्रवादीच्या गटाला यश आलंय. भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपाच्या हातून ही ग्रामपंचायत निसटली असून राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.
2. देवीभोयरे येथे निवडणूक निकालानंतर हाणामारी
अटक करण्यात आलेल्यांमध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष बेलोटे, माजी उपसरपंच विकास सावंत, रामकृष्ण जाधव, भाऊसाहेब बेलोटे, ज्ञानदेव बेलोटे, शिवाजी जाधव, विठ्ठल सरडे, अशोक मुळे, दत्तात्रय मुळेे, जगण बेलोटे यांना पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ अटक केली आहे. 19 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून नऊ कार्यकर्ते फरार आहेत.
3. मतदान न केल्याने बाबुर्डी येथे राडा
सुभाष गाडगे यांच्या फिर्यादीवरून विकास गाडगे, विशाल गाडगे, निलेश दिवटे, अंकुश गाडगे, नंदाबाई गाडगे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4. राजकारणाची पहिली पायरी चढलेल्या तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण
राजकारणाची पहिली पायरी चढलेल्या या युवकांना विशेष प्रशिक्षण देऊन समाजसेवेसाठी सज्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे. तसेच यामध्ये त्यांना सामान्य माणसाप्रती जबाबदार प्रतिनिधित्व करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल असेही तांबे म्हणाले
5. मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख गटाचे एकवीस अर्ज शिल्लक राहिले. इतरांनी अर्ज मागे घेतल्याने अखेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणुक बिनविरोध झाल्याचे जाहिर केले.
6. ३० जानेवारीला अण्णा हजारे उपोषणाला बसणार
अण्णा हजारे ३० जानेवारी या हुतात्मा दिनापासून आंदोलन करतील. कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे या प्रमुख मागण्यांसाठी हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे. आपल्या आयुष्यातील हे शेवटचे आंदोलन असेल, असा निर्धारही हजारे यांनी व्यक्त केला आहे.
7. दोन वाळू तस्करांवर गुन्हा
श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी येथील भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणार्यांवर श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक भोसले व गोकुळ भांडलकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला
8. शिवसेना 56, राष्ट्रवादी 2 तर भाजपच्या ताब्यात एक ग्रामपंचायत
कुकाणे ग्रामपंचायतीत तब्बल दहा वर्षांनंतर सत्तांतर होऊन आमदार पांडुरंग अभंग गटाने बाजी मारली तर सोनाइत मतदारांनी नाकारल्याने माजी खासदार तुकाराम गडाख गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले तर एक हाती सत्ता असलेला देवगावात दोन जागा पटकावल्याने गडाख गटाच्या एन्ट्रीने मुरकुटे यांना धक्का बसलाय
9. श्रीरामपूर शहराच्या पर्यटन विकासात पहिले पाऊल
श्रीरामपूर शहर विकासासंदर्भात ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत राहिल असे आश्वासनआदित्य ठाकरे साहेब यांनी दिले. तसेच अॅक्वारियम संदर्भात तातडीने आवश्यक त्या बाबींची पुर्तता करावी अश्या सूचना संबधित अधीकार्यांना दिल्या.
10. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी नेले १५३ उमेदवारी अर्ज
25 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी येत्या 20 फेबु्रवारीला मतदान होणार आहे.
No comments
Post a Comment