Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - अक्षय सोबत पुन्हा एकदा काम करणार जगन शक्‍ती

No comments

            News24सह्याद्री अक्षय सोबत पुन्हा एकदा काम करणार जगन शक्‍ती.....पहा गॉसिप कल्ला


TOP HEADLINES

1. रितेश देशमुख इन्स्टाग्रामच्या सायबर फ्रॉडचा शिकार

आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता  रितेश देशमुखने  इन्स्टाग्रामवर सायबर फसवणूक होत असल्याचा एक संदेश लोकांना दिलाय. या बाबत रितेशने एक ट्विट केले आहे आणि काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तर दुसऱ्या ट्विटमध्ये महाराष्ट्र सायबर सेल विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आलीय. या सर्व प्रकाराचा अनुभव स्वतः रितेश देशमुखला आलाय. या हॅकिंग मध्ये इन्स्टाग्रामवर एक संदेश येतो तुम्ही शेअर केलेली पोस्ट कॉपीराइट उल्लंघन दाखवते आहे असं या मेसेज मध्ये दाखवण्यात येत असल्याचे या अनुभवत रितेशने सांगितलं आहे. 

2. अक्षय सोबत पुन्हा एकदा काम करणार जगन शक्‍ती

अभिनेता अक्षय कुमारचा मिशन मंगल या चित्रपटाच्या माध्यमातून जगन शक्ती यांनी दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं होत, विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर अक्षय कुमार आणि जगन शक्ती मिशन मंगलनंतर मिशन लायन या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. मात्र, या चित्रपटासाठी त्यांनी आपलं मानधन वाढवलं असल्याचं बोललं  जात आहे. या चित्रपटासाठी जगन शक्ती तब्बल ४ कोटी रुपये मानधन घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जगन शक्तीप्रमाणेच अक्षयनेदेखील या चित्रपटासाठी तगडं मानधन घेतलं आहे. या चित्रपटाची निर्मिती वाशू आणि जॅकी भगनानी करणार आहेत.

3. नव्या रुपात अवतरली बालिका वधू फेम अविका गोर

काही वर्षांपूर्वी बालिका वधू या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अविका गोरने आपल्या गोंडस रुपाने आणि अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. आता अविकाने आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अतिशय स्लीम ट्रीम आणि आकर्षक दिसणाऱ्या अविकाचे बोल्ड अंदाजातील हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, अविकाचा हा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.  अविकानं आपलं वजन कमी केल्याचं आणि आपला लूक बदलल्याचं या फोटोवरून दिसत आहे. तिचा हा फोटो बघून चाहत्यांनी तिचे कौतुक केले असून, ब्युटीफुल, पॉवर टू यु गर्ल, डॅशिंग लूक अशा कमेंटस केल्या आहेत.

4. रणबीर आणि आलियाचा  राजस्थान दौरा 
कोरोना दरम्यानच अनेक सेलिब्रेटी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसले. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या कपलने. पहिल्यांदाच कपूर आणि भट्ट फैमिली ने राजस्थानमध्ये रणथंभौर येथे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते. तीन दिवस दोन्ही कुटुंबाने एकत्र वेळ घालवला. एयरपोर्टवर रणबीर कपूर आलिया भट्ट, नीतू सिंह, शाहिन भट्ट, सोनी राजदान , अयान मुखर्जी दिसले होते. दोन्ही कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यात रणबीर हा आलियाला एक मिनीटं देखील एकटं सोडत नव्हता. 

5. पहिल्याच चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायिकही असलेल्या फरहान अख्तरचाआज 47 वा वाढदिवस आहे. फरहानचा जन्म 9 जानेवारी 1974 रोजी मुंबई येथे झाला होता. फरहान जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा आहे. फरहानने वयाच्या 17 व्या वर्षी काम करण्यास सुरवात केली, परंतु फरहान तब्बल 2 वर्ष घरी बसून होता तो कोणतेही काम करत नव्हता त्यामुळे त्याच्या आईने काम कर नाहीतर घराच्या बाहेर हाकलून देण्याची धमकी दिल्यानंतर फहरानने काम करण्यास सुरूवात केली.  No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *