15 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता - रोहित पवार....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कोरोना प्रतिबंधक लसीकरण शनिवारपासून सुरू होत आहे
लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
2. संजय राऊतांचा भाजपला टोला
दिल्लीत सध्या कृषी कायद्यांविरोधात मोठे आंदोलन सुरु आहे. ही गंभीर बाब आहे. यावरुन दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप होत आहेत. मग त्यांनी दररोज राजीनामा दिला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
3. माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता - रोहित पवार
पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत काही बोलता येणार नाही. मात्र, हा काही प्रमाणात हा बदनामीचा आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचे पुढे येतय, असं रोहित पवार म्हणाले. धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सत्य परिस्थिती मांडलीय, माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, असं रोहित पवार म्हणाले
4. ठाकरे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही- संजय राऊत
“विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे
5. तज्ज्ञ समितीतून मान यांची माघार
समितीतील सदस्यांवर होत असलेल्या टीकेमुळे अखेर मान यांनी सदस्यपद स्वीकारण्यास नकार दिला असून, अन्य सदस्यांनीही त्यांचा कित्ता गिरवावा, असे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे.
6. खडसे आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार
कोरोनाची बाधा झाल्यामुळे एकनाथ खडसे त्यावेळी चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.
7. कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन
काँग्रस पक्ष आज 'किसान अधिकार दिवस' साजरा करणार आहे. त्यातूनच देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी कार्यकर्त्यांसह दिल्ली आंदोलनात सहभागी होणार आहे.
8. मतदान यंत्रावरुन उमेदवाराचे नाव गायब
सर्व गोंधळामुळे येथील निवडणूक प्रक्रिया खोळंबली असून प्रशासनाचे अधिकारी गावात पोहोचले आहेत. त्यांच्याकडून मतदान यंत्राच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.
9. दलदलीत बुडून मुंबईत चिमुरड्याचा अंत
देशभरात मकरसंक्रांतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना मुंबईत गालबोट लागलं. कापलेली पतंग पकडताना तबेल्यात गेलेल्या दहा वर्षांच्या चिमुरड्याचा शेणाच्या दलदलीत बुडून मृत्यू झाला. ऐन संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
10. प्रेयसीची हत्या करुन फ्लॅटच्या भिंतीत मृतदेह तीन महिने लपवला
वाणगावमधील वृंदावन या सदनिकेल्या एका फ्लॅटच्या भिंतीत तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
No comments
Post a Comment