13 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - विवाहबाह्य संबंधाचा कायदा सशस्त्र दलात लागू करण्याची केंद्र सरकारची मागणी...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. नेपाळच राजकारण तापलं असतानाच ओली यांचं महत्वाचं वक्तव्य
नेपाळला स्वत:चं स्वातंत्र्य प्रिय असून आम्ही इतर देशांचे आदेश मानणार नाही, असंही ओली यांनी म्हटलं आहे. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक असून दोन्ही देशांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, असा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला आहे.
2. गोडसे ज्ञानशाळा’ वाचनालय दोन दिवसांतच बंद
कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा दंडाधिका्यांनी परिसरात कलम १४४ लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे वाचनालय बंद करण्यात आलं, अशी माहिती ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक अमित संघी यांनी दिली.
३. विवाहबाह्य संबंधाचा कायदा सशस्त्र दलात लागू करण्याची केंद्र सरकारची मागणी
केंद्र सरकारने कोर्टात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस जारी करून हे प्रकरण सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याकडे पाठवलं आहे.
४. सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी
भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबतची घोषणा केली. राजेश काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. भाजपच्या गोटातून त्यांची उपमहापौर पदावरुन आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होती. त्यामुळे अखेर भाजपच्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतलाय.
५. एलन मस्क यांच्या टेस्लाची भारतात एन्ट्री
सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार असून कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील केली आहे.
६. चांदुरबाजारातील शेतकरी बेपत्ता
माझ्या पतीने जर आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू त्यांचे खाजगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार,बीट जमादार हे जबाबदार राहतील अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याच्या पत्नीने शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान देऊरवाडा जिल्हा अमरावती येथील शेतकरी विजय सुने हे चिठ्ठी लिहुन घर सोडुन गेले.या प्रकरणाबाबत ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी वक्तव्य केलं आहे.
७. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे भंडारा रुग्णालयाला २ लाख देण्याचे निर्देश
खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितलय .
८. सोनू सूदचा न्यायालयात दावा
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मुंबई महापालिकेने त्याच्यावर भेदभाव केल्याचा दावा न्यायालयात केला. सोनूसूदने दाखल केलेल्या या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सोनू सूदने हा दावा केलाय .
९. फेब्रुवारीपासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा सुरु होण्याची शक्यता
बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेची ऑनलाइन सभा १७ जानेवारीला होणार असून, या बैठकीच्या विषयपत्रिकेवर सात मुद्दे आहेत. यापैकी देशांतर्गत क्रिकेट हंगामातील रणजी स्पर्धा तसेच कनिष्ठ आणि महिलांच्या गटांच्या स्पर्धा हे विषय ऐरणीवर असतील.
१०. पुणे महापालिकेचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच
मनपा निवडणुकीला अजून एक वर्षाचा वेळ बाकी असला तरी मी जबाबदारीने सांगते की, पुणे महानगरपालिकेचा पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल, असे ठाम मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलय.
Tags:
No comments
Post a Comment