21 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - महाराष्ट्रातून ४ हजार शेतकरी बाईक रॅलीने गाठणार दिल्ली....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
ब्रिटनहून येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकीवर भारताकडून बंदी
केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागून होणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे निधन
प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले
महाराष्ट्रातून ४ हजार शेतकरी बाईक रॅलीने गाठणार दिल्ली.
हे सर्व शेतकरी ‘ऑल इंडिया शेतकरी सभे’च्या बॅनरखाली बाईक रॅलिद्वारे दिल्लीला जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
प्लॅटफॉर्मवर सापडलेल्या मुलीचे गृहमंत्री देशमुख यांनी केलं कन्यादान
दिव्यांग, गतिमंद आणि बेवारस मुला-मुलींचे पालकत्व घेणाऱ्या सांभाळ करणाऱ्या शंकरबाबा पापळकरांकडील समीर आणि वर्षा या दाम्पत्याच्या विवाहसोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण नागपूर शहरात होत आहे.
प्रतापगडावर जिल्हा प्रशासनाने साजरा केला शिवप्रताप दिन
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात प्रतापगडावर (ता. महाबळेश्वर) भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली. व्यवस्थापक ओंमकार देशपांडे यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.
माझी इच्छा आहे महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवावी – फडणवीस
आगामी काळात भाजपात अनेकांचा प्रवेश होणार आहे, भाजपा सोडून कुणीही जाणार नाही. काहीजण उगाचच वावड्या उठवत असल्याचं म्हणत फडणवीस यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचेही दिसून आले.
माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा भाजपात
प्रवेश
सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं.
अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालया समोर जी.आर.ची होळी
शासनाने यावर अजुनही काहीच निर्णय घेतला नाही.त्यामुळे आदिवासी संघर्ष समितीने तथा माजी मंत्री डॉ दशरथ भांडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयसमोर होळी करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेय.
महाबळेश्वरला मागेटाकत परभणी आज पुन्हा गारठली,
मॉर्निंग वॉक करणाऱ्याच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. तर दूध आणि भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना पहाटे थंडीचा सामना करावा लागत आहे.
सचिन तेंडुलकरनं वाहिली कल्याणकर क्रिकेटपटूला श्रद्धांजली
विजय शिर्के हे ८० च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळायचे. आपल्या जवळच्या मित्राच्या निधनाने भावूक झालेल्या सचिनने ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
No comments
Post a Comment