मोठी बातमी - रेखा जरेंच्या हस्ताक्षरातील चार पानी पत्र पोलिसांच्या हाती
News24सह्याद्री -
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे यांच्या खुनाच्या तपासात नवनवीन सत्ये समोर येऊ लागली आहेत. या तपासकामात पोलिसांनी रेखा जर यांच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान रेखा जरे यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले एक चार पानी पत्रच पोलिसांच्या हाती लागले आहे. रेखा जरे यांनी या पत्राद्वारे बाळ बोठे हा कशाप्रकारे त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता याचे सविस्तर लेखन केले आहे. पोलिसांनी रितसर पंचनामा करून ते पत्र ताब्यात घेतले असून, रेखा जरेंच्या हस्ताक्षरातील हे पत्र पोलिसांच्या हाती लागलेला एक सबळ पुरावा ठरू शकेल. असे झाल्यास बाळ बोठे याच्यासमोर असलेल्या अडचणी अधिकच तीव्र होणार आहेत असे लक्षात येते.अगदी नियोजनबद्धरित्या खुनाचा कट रचून, त्या कटाची यशस्वी अंमलबजावणी करूनही, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झालेल्या बाळ बोठे ह्याच्या गुन्हेगारी मानसिकतेचा विचार करता, भीतीच्या छायेत असणाऱ्या जरे ह्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिले गेले आहे.
No comments
Post a Comment