गॉसिप कल्ला - तैमूरने काढला हातावर टॅट्यू, वाढदिवशी व्हिडीओ व्हायरल
News24सह्याद्री - तैमूरने काढला हातावर टॅट्यू, वाढदिवशी व्हिडीओ व्हायरल...पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
करणवीर बोहराच्या घरी चिमुकलीचं आगमन
‘नागिन’ या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता करणवीर बोहराच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. करणवीरची पत्नी तीजय सिधूने मुलीला जन्म दिला. या दोघांना आधी जुळ्या मुली आहेत.
आता सनीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सनी रिक्षामधून प्रवास करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सनी एका रिक्षामधून उतरताना दिसत आहे. ती रिक्षामधून उतरताच फोटोग्राफर तिचे फोटो काढताना दिसत आहेत.
‘डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
डार्लिंग’ या आगामी मराठी सिनेमाच्या निर्मात्यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं घोषित करून सिनेमासृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. ‘‘डार्लिंग तू’’ आणि ‘‘ये है प्या ’’ या दोन्ही गाण्यांनंतर आता सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
तैमूरने काढला हातावर टॅट्यू, वाढदिवशी व्हिडीओ व्हायरल
२० डिसेंबर रोजी तैमूरचा चौथा वाढदिवस होता बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तैमूरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान तैमूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तैमूरच्या हातावर टॅट्यू काढत असल्याचे दिसत आहे.
‘माझ्या नवऱ्याची बायको’या मालिकेतील अभिनेत्री घेणार एक्झिट?
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका सध्या सुपरहिट असून मालिकेत पात्र हे सतत चर्चेत असतात. आता या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे.
No comments
Post a Comment