Breaking News

1/breakingnews/recent

धुळ्यातील अंबिका नगरमधून लाखोंचा गुटखा जप्त

No comments




मुंबई -

धुळ्यातील अंबिकानगर येथून चाळीस गाव रोड पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. चाळीस गाव पोलिस ठाण्याचे पथक दि. ३० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्याचा सुमारास पेट्रोलिंग करित असतांना, एका बंद घरात विमल गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला,  त्यावेळी घरात अय्युब रशिद खाटीक हा सापडला.  पोलिसांनी घराची झडती घेतली असता खाकी रंगाच्या १३ गोण्यांमध्ये केसरयुक्त पान मसाल्याचा पुड्या  पांढऱ्या रंगाच्या १३ गोण्यांमध्ये व्हि - १ तंबाखूच्या पुड्या भरलेल्या आढळून आल्या पोलिसांनी सुमारे ४ ते ५ लाखाच्या गुटख्यासह अय्युब रशिद खाटीक ला ताब्यात घेतले आहे.  या कारवाईत सापडलेले तंबाखू जन्य पदार्थ  पुढील कार्यवाही साठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सुपुर्द करण्यात आले. सदर कारवाई धुळे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव आणि पोलिस उप अधीक्षक प्रदीप पाडवी, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात अली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *