Breaking News

1/breakingnews/recent

28 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री - किरीट सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये



TOP HEADLINES


1. दीपक डोंगरे  जिल्ह्यातून तडीपार
जालना जिल्ह्यात भाजप आमदारच्या घरातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या भाच्यावर जालना पोलिसांनी तडीपरीची कारवाई केली आहे. दीपक डोंगरे याला जालना जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार केले आहे.

2. उघडया ड्रेनेजमध्ये चिमुरड्याचा म्रुतदेह..
आईवडीलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती.काल यश चा म्रुतदेह एका बंद कपंनीच्या ड्रेनजच्या एका उघड्या टाकीत म्रुतअवस्थेत मिळुन आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.यश येथे कश्यासाठी गेला होता.याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरे हे तपास करत आहेत.

3. फुलांचे वैविध्यपूर्ण सौंदर्य  
मन मोहून टाकणाऱ्या विविध फुलांनी सध्या विद्यापीठ परिसरात चैतन्य निर्माण झाले असून, नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांच्या दृष्टिक्षेपात ही शेवंतीची बाग पडत असल्याने रोज हजारो लोक शेवंतीची फुले बघण्यासाठी गर्दी करीत आहेत.

4. गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेच्या महिला आघाडीचे आंदोलन  
 मोठ्या संख्येने महिला आघाडीच्या महिला उपस्तीथ होत्या, केंद्रसरकार विरोधात जोरदार नारेबाजी करत महिलांनी अच्छे दिन कुठं गेले असा जाब विचारात कुठं नेऊन ठेवलाय देश माझा असा सवालही केला. दरम्यान रास्ता रोकोमुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

5. स्व. बाबुराव साहेबराव उपाख्य डॅडी देशमुख जयंती समारोह संपन्न
 जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले, हॉटेल सेंटर प्लाझा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या समवेत विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, महापौर अर्चनाताई मसने,इतर मान्यवरही उपस्थित होते

6. नवाब मलिक यांचा भाजपला सवाल
भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,'असा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.तसेच तुमच्या ईडीच्या कारवायांना कोण घाबरतंय असा सवाल देखील त्यांनी केला आहे.  

7. किरीट सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल
किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत तुम्ही लाभार्थी आहात, त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल, असा इशाराही संजय राऊतांना दिलाय
 
8. पुण्यात गरवारे पुलावरुन कार खाली कोसळली
पुण्यातील डेक्कन परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. गाडी वेगाने जात असताना अचानक कुत्रे गाडीसमोर आले. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी गरवारे पुलावरुन भुयारी मार्गात कोसळली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
 
9. आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. पण महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी काम सुरूच ठेवणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

10. एसटी महामंडळाकडून प्रवाशांना खुशखबर
 रायगड, महाबळेश्वर, लोणावळा दर्शन या विशेष बससेवांपाठोपाठ आता एसटी महामंडळ पुणे विभाग प्रवाशांना रामोजी फिल्मसिटीची सफर घडविणार आहे. त्यासाठी एसटीची लक्झरी बस प्रवाशांचे सेवेत असेल. प्रवाशांना परवडणाऱ्या दरात दोन रात्रीच्या मुक्कामासह फिल्मसिटी पाहता येणार आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *