‘महाविकास आघाडी सरकार भांबावलेल' – दरेकर
मुंबई -
कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आणि नाताळ, नववर्षाच्या सेलिब्रेशनला होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यावरुन आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार भांबावलेले आहे. यांना आलेली लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा होतो अशा शब्दात दरेकर यांनी ठाकरे सरकारला टोला हाणलाय. यापूर्वी अनलॉकिंगला सुरुवात केल्यानंतर हॉटेल, मंदिरे, मंडई यांना परवानगी दिली होती. मग आता निर्बंध का लावले जात आहेत? असा प्रश्न दरेकांनी विचारलाय.
ब्रिटिश एअरवेजच्या सर्व विमानफेऱ्यांवर आपण बंदी आणली आहे. कोरोना संकटासोबतच राज्यावर आणि सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यात इथला माणूस पिचला गेलाय. त्याला अजून संकटात टाकू नका, असे आवाहन दरेकर यांनी राज्य सरकारला केलेय.सर्वसामान्य माणसाला नाउमेद करु नका. कोरोनापेक्षा तो उपासमारीने मरेल. छोट्या-मोठ्या व्यावसायीकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने ते होताना दिसत नसल्याचे खंतही दरेकरांनी व्यक्त केली.

No comments
Post a Comment