Breaking News

1/breakingnews/recent

'ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक': निलेश राणे यांची टीका

No comments



मुंबई -

 शिवसेना आमदार राजन साळवी वक्तव्य केले होते.नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी सरकार पुढाकार घेईल,  मात्र काही वेळातच त्यांच्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा असून ९० टक्के स्थानिकांनी मोबदला स्वीकारला आहे. पण हे माझे वैयक्तिक मत आहे. ही शिवसेनेची भूमिका नाही. मी केवळ स्थानिक ग्रामस्थांची भूमिका मांडली, असे साळवींनी स्पष्टीकरण दिले. 

त्यानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी साळवींना भाजपाकडून आमदारपदाची खुली ऑफर दिली.शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *