दिल्लीतले आंदोलन देशभर पसरले पाहिजे; अण्णा हजारे यांची सरकारवर टीका
मुंबई -
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्रातील एनडीए सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहेत. मोदी सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यामध्ये सातत्याने बैठका सुरू आहे, पण त्यातून अद्यापही तोडगा निघालेला . शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे. या बंदच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
मी सर्व भारतीयांना आवाहन करतो की सध्या जे आंदोलन दिल्लीत सुरू आहे, ते आंदोलन संपूर्ण भारतभरात परसण्यासाठी साऱ्यांनी सहभागी व्हा. केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. असे घडले तरच सरकारवर दडपण येईल. पण रस्त्यावर उतरून आंदोलन करताना एका गोष्टीच भान ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे की कोणत्याही प्रकारचा हिंसक प्रकार घडून द्यायचा नाही. सरकार केवळ आश्वासने देत पण मागण्या कधीच पूर्ण करत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मी आधीही पाठिंबा दिला होता आणि आताही पाठिंबा देत राहीन, अशा शब्दात राळेगणसिद्धी येथे बोलताना अण्णा हजारेंनी आपली भूमिका मांडली आहे.
शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, शेतकरी आज रस्त्यावर आहे. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, त्याला कोणतेही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतले पाहिजे. आपण विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहे याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आज शेतकरी रस्त्यावर आहे. तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे? याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने सरकारने विचार केला पाहिजे.असे ते म्हणाले .

No comments
Post a Comment