भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंनी सोडले मौन
मुंबई -
ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्याची एक्स्लुझिव्ह दाखवली होती. त्या बातमीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी आता शिक्कामोर्तब केले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले. मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना हे आवडत नाही.
ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहे त्यातून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायच असते असं एकनाथ खडसे म्हणाले. यापूर्वी अनेकदा माझी चौकशी केली आहे. त्यावेळी मी हजर राहिलो आहे. त्यांनी माझ्याकडे जे कागदपत्रं मागितले, ते मी दिले आहेत. याही वेळेस ईडी जे काही कागदपत्रं मागतील त्यांनी मी सहकार्य करेन अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान आली.
माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्या यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु. मी जास्त काही बोलणार नाही. येत्या 30 डिसेंबरला मला हजर रहायला सांगितल आहे. मला तसा समन्स आला आहे. मी त्यानुसार उपस्थित राहणार आहे.

No comments
Post a Comment