Breaking News

1/breakingnews/recent

राहुल गांधींचा मोदी सरकारवर सरकारवर निशाणा: शेतकऱ्यांवर 'मित्रां'च्या कायद्याचा वार'

No comments



मुंबई -

कोरोनाचे संकट देशात सध्याप्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. अशातच बरोजगारीचंही संकट देशासमोर उभं राहिले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात रोजगारात ०.९ टक्क्यांची घट झाली. त्यामुळे तब्बल ३५ लाख नोकऱ्यांवर संकट उभं राहिलं. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ऑक्टोबर महिन्यातही रोजगारात ०.१ टक्क्यांची घट झाली होती. युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार. शेतकऱ्यांवर मित्रांच्या कायद्यांचा वार, हेच आहे मोदी सरकार असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

गेल्या ३३ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा ३४ वा दिवस आहे. दरम्यान, हे शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी शेतकरी नेते आणि सरकारमध्ये ३० डिसेंबर रोजी चर्चा पार पडणार आहे. या चर्चेसाठी शेतकरी संघटनाही तयार असल्याचे  म्हटले जात आहे. यापूर्वी शेतकरी नेत्यांकडून ही चर्चा २९ डिसेंबर रोजी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु सोमवारी सरकारकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विज्ञान भवनात शेतकरी संघटनांना आमंत्रित करण्यात आल्याचं नमूद करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबरपासून ४० शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *