तर कठीण काळातही काँग्रेस तरली असती - बाळासाहेब थोरात
मुंबई -
वडेट्टीवारांविरोधात निवडणूक लढलेले शिवसेना उमेदवार संदीप गड्डमवार यांच्यासह रवींद्र शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि खुद्द विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीतच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.काँग्रेस पक्षात कार्यकर्ते आणि नेते घरवापसी करत आहेत. राष्ट्रीय विचारधारा पाळणारा पक्ष म्हणून काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 40 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या उमेदवारांना त्यावेळी ताकद मिळाली असती तर कठीण काळातही काँग्रेस तरली असती. राज्यात वेगळ चित्र दिसले असते. पण आता पक्ष वाढवायचा आहे. आागामी महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश थोरातांनी कार्यकर्त्यांना दिले.

No comments
Post a Comment